Ranji Trophy 2019-20: विजय शंकर याची तमिळनाडूच्या कर्णधारपदी नियुक्ती, सूर्यकुमार यादव करणार मुंबईचे नेतृत्व
विजय शंकर आणि सूर्यकुमार यादव (Photo Credit: Getty)

9 डिसेंबरपासून रणजी ट्रॉफीची सुरुवात होत आहे. शानदार फॉर्ममध्ये असलेला फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याला सोमवारी मुंबई रणजी संघाचा (Mumbai Ranji Squad) कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. नुकत्याच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 29 वर्षीय फलंदाजाने प्रभावी काम केले होते ज्यात मुंबई लीग फेरीतच बाद झाली होती. रणजी ट्रॉफीत मुंबई आपला पहिला सामना बडोद्याविरुद्ध 9 डिसेंबरपासून वडोदराच्या मोती बाग स्टेडियममध्ये खेळणार आहे. 2014-15 च्या रणजी ट्रॉफीसाठी सूर्यकुमारने मुंबईचे नेतृत्व केले होते. दुसऱ्याची घरगुती क्रिकेटमध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीनंतर आता रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) खेळली जाणार आहे. यासाठी सर्व संघांनी आपली तयारी सुरू केली आहे. 9 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या टूर्नामेंटसाठी संघांनी आपल्या कर्णधारांची घोषणा करण्यास सुरवात केली. मुंबईसह तामिळनाडू (Tamil Nadu) संघानेही कर्णधाराची घोषणा केली आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात 1 धावांनी पराभूत झाल्यानंतर आता तामिळनाडूने रणजी ट्रॉफीसाठी अष्टपैलू विजय शंकर (Vijay Shankar) याची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे, तर बाबा अपराजित (Baba Aparajit) याला संघाचा उपकर्णधार बनविण्यात आले आहे. (BCCI कडून U-19 क्रिकेट विश्वचषक 2020 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा)

आजवर घरगुती मोसमात फारशी चांगली कामगिरी करू न शकणाऱ्या आंध्र प्रदेश संघाने अष्टपैलू हनुमा विहारी (Hanuma Vihari) याला कर्णधार बनवले आहे आणि श्रीकर भरत (S Bharat) याची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विहारी भारतीय कसोटी संघाचा नियमित सदस्य आहे, कोलकाता कसोटीसाठी साहाचा पर्याय म्हणून भरतचा संघात समावेश करण्यात आला होता. बडोदाविरुध्द मुंबई रणजी मोहिमेची सुरुवात करेल, तर तमिळनाडू 9 डिसेंबरला कर्नाटकविरुद्ध पहिला सामना खेळेल.

असे आहेत मुंबई, तामिळनाडू, आंध्रप्रदेशचे रणजी ट्रॉफी संघ:

मुंबई संघ: सूर्यकुमार यादव (कॅप्टन), आदित्य तरे (उपकर्णधार), अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, जय बिस्त, शुभम रंजणे, आकाश पारकर, सर्फराज खान, शम्स मुलानी, विनायक भोईर, शशांक अत्तरदे, शार्दूल ठाकूर, तुषार देशपांडे, धवल कुलकर्णी, आणि एकनाथ केरकर.

पहिल्या दोन सामन्यांसाठी तामिळनाडू संघ: विजय शंकर (कॅप्टन), बाबा अपराजित, (उपकर्णधार), एम. विजय, अभिनव मुकुंद, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक ), एन. जगदीसन (विकेटकीपर), आर. अश्विन, साई किशोर , टी. नटराजन, के. विग्नेश, अभिषेक तंवर, एम. अश्विन, एम. सिद्धार्थ, शाहरुख खान, के मुकुंठ.

आंध्रप्रदेश संघ: हनुमा विहारी (कॅप्टन), के एस भारत (उपकर्णधार), रिकी भुई, डीबी प्रशांत कुमार, सीआर ज्ञानेश्वर, एन ज्योती साई कृष्णा, के करण शिंदे, बी सुमंत, पी गिरीनाथ रेड्डी, बी अयप्पा, के व्ही शशिकांत, स्टीफन, पी. विजय कुमार, वाई पृथ्वीराज, जी मनीष आणि डी नरेन रेड्डी.