भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (Board of Control for Cricket in India) सोमवारी दक्षिण अफ्रिका (South Africa) येथे होणाऱ्या अंडर-19 टी-20 विश्वचषक 2020 ( U-19 World Cup 2020) स्पर्धेसाठी भारतीय संघाची (Indian Cricket Team) घोषणा केली आहे. 17 जानेवारी 2020 पासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तसेच अंतिम सामना 9 फेब्रुवारी पॉचेफस्टरूम येथे रंगणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने प्रियांम गर्ग याच्याकडे कर्णधार पदाची जबाबदारी सोपवली आहे. गेल्या विश्वचषकात भारतीय संघाने सर्वोकृष्ट कामगिरी केली होती. तसेच दक्षिण अफ्रिका येथे होणाऱ्या अंडर-19 टी-20 विश्वचषक 2020 स्पर्धेत निवडलेला भारतीय संघ उत्तम कामिगिरी करेल, अशी अपेक्षा केली जाते. जपान, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यासह गट 'अ' मध्ये भारताचा समावेश आहे.
बीसीसीआयचे ट्वीट-
Four-time winner India announce U19 Cricket World Cup squad. Priyam Garg to lead the side. pic.twitter.com/VEIPxe2a2n
— BCCI (@BCCI) December 2, 2019
अंडर 19 टी-20 विश्वचषक 2020 मधील भारतीय संघ:
प्रियांम गर्ग (कर्णधार), ध्रुव जुरेल (उपकर्णधार / विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, दिव्यंश सक्सेना, शाश्वत रावत, दिव्यांग जोशी, शुभंग हेडगे, रवी बिश्नोई, आकाश सिंग, कार्तिक त्यागी, अथर्व अकोलेकर, कुमार कुशर्ग, सुशांत मिश्रा, विद्याधर पाटील