
RR vs RCB IPL 2025 28th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) चा 28 वा सामना रविवार म्हणजेच 13 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RR vs RCB) यांच्यात जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जात आहे. या हंगामात, राजस्थानचे नेतृत्व संजू सॅमसन करत आहे. तर, बंगळुरुची कमान रजत पाटीदार यांच्या खांद्यावर आहे. या हंगामात दोन्ही संघांची कामगिरी संमिश्र राहिली आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये कठीण स्पर्धा पाहायला मिळेल. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थानने बंगळुरुसमोर 174 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Not the smoothest ride for RR, but they've still got a fighting total. Will it be enough on this pitch?
Scorecard: https://t.co/vPyGB17ZAW #RRvRCB #IPL2025 pic.twitter.com/WhJ6k6Hza0
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) April 13, 2025
यशस्वी जयस्वालने खेळली 75 धावांची शानदार खेळी
प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने निर्धारित 20 षटकांत चार गडी गमावून 173 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सचा घातक सलामीवीर यशस्वी जयस्वालने 75 धावांची शानदार खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, यशस्वी जयस्वालने 47 चेंडूत 10 चौकार आणि दोन षटकार मारले. यशस्वी जयस्वाल व्यतिरिक्त ध्रुव जुरेलने नाबाद 35 धावा केल्या.
दुसरीकडे, स्टार अष्टपैलू कृणाल पांड्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, कृणाल पांड्या आणि यश दयाल यांनी सर्वाधिक विकेट्स घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला 20 षटकांत 174 धावा कराव्या लागतील. दोन्ही संघांना हा सामना जिंकून स्पर्धेत दोन गुण मिळवायचे आहेत.