Wanindu Hasaranga And Nitish Rana (Photo Credit - X)

Rajasthan Royals vs Chennai Super Kings: इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) चा 11 सामना रविवारी 30 मार्च रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (Rajasthan Royals vs Chennai Super Kings) यांच्यात बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी येथे खेळवला गेला. या सामन्यात राजस्थानने चेन्नईचा 6 धावांनी पराभव करत या हंगामातील पहिला विजय नोंदवला आहे. त्याआधी, चेन्नईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थानने चेन्नईसमोर 183 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नईने 20 षटकात 6 गडी गमावून 176 धावा केल्या.

नितीश राणाची 81 धावांची शानदार खेळी

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थानने 20 षटकात 10 गडी गमावून 182 धावा केल्या. राजस्थानकडून नितीश राणाने 81 धावांची शानदार खेळी केली. त्याने 36 चेंडूत 10 चौकार आणि 5 षटकार मारले. त्याच्याशिवाय रियान परागने 37 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्जडून खलील अहमदन आणि नूर अहमदने आणि मथीशा पाथिराणाने प्रत्येतकी 2-2 विकेट घेतल्या.

वानिंदू हसरंगा घेतल्या सर्वाधिक 4 विकेट्स

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नईच्या संघाने 20 षटकांत सहा विकेट गमावून 176 धावा केल्या. चेन्नईकडून कर्णधार ऋतुराज गायकडवाने 63 धावांची शानदार खेळी केली. या धमाकेदार खेळीदरम्यान, गायकवाडने 44 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकार मारला. गायकवाड व्यतिरिक्त, रवींद्र जडेजाने 32 धावा केल्या. राजस्थाकडून वानिंदू हसरंगा सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.