CSK vs RR (Photo Credit - X)

Rajasthan Royals vs Chennai Super Kings: इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) चा 11 सामना रविवारी 30 मार्च रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (Rajasthan Royals vs Chennai Super Kings) यांच्यात बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी येथे संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाणार आहे. या हंगामात, राजस्थानचे नेतृत्व तीन सामन्यासाठी रियान पराग करत आहे. तर, चेन्नईची कमान ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर आहे. या हंगामात, राजस्थानने दोन्ही सामने गमावले आहे. तर चेन्नईने एक सामना जिंकला आणि एक गमावला आहे. त्यामुळे दोन्ही संघासाठी आजचा सामना महत्वाचा आहे. (हे देखील वाचा: RR vs CSK IPL 2025 11th Match Winner Prediction: राजस्थान रॉयल्स की चेन्नई सुपर किंग्ज कोणता संघ आज होणार विजयी? वाचा मॅच प्रेडिक्शन रिपोर्ट)

हेड टू हेड रेकाॅर्ड (CSK vs RR Head to Head)

आयपीएलच्या इतिहासात राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात एकूण 29 सामने खेळले गेले आहेत. या काळात, चेन्नई सुपर किंग्जने वरचढ कामगिरी केली आहे. चेन्नई सुपर किंग्जने 16 सामने जिंकले आहेत. तर, राजस्थान रॉयल्सने 13 सामने जिंकले आहेत. गेल्या हंगामात दोन्ही संघांमध्ये फक्त एकच सामना खेळला गेला होता आणि हा सामना चेन्नई सुपर किंग्जने 5 विकेट्सने जिंकला होता. राजस्थान रॉयल्सला यावेळी पुनरागमन करायचे आहे.

राजस्थानच्या 'या' खेळाडूंनी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध केला आहे कहर 

राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध सहा सामने खेळले आहेत. यादरम्यान, यशस्वी जयस्वालने 36.67 च्या सरासरीने आणि 158.04 च्या स्ट्राईक रेटने 266 धावा केल्या आहेत. यशस्वी जयस्वालने 3 अर्धशतके झळकावली आहेत. यशस्वी जयस्वाल व्यतिरिक्त, कर्णधार संजू सॅमसनने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 15 डावात एका अर्धशतकाच्या मदतीने 229 धावा केल्या आहेत. त्याचप्रमाणे, वेगवान गोलंदाज संदीप शर्माने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 41.67 च्या सरासरीने 12 विकेट्स घेतल्या आहेत.

चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूंनी राजस्थान रॉयल्सविरुद्ध केली आहे अशी कामगिरी 

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने आतापर्यंत राजस्थान रॉयल्सविरुद्ध 7 सामने खेळले आहेत. यादरम्यान, ऋतुराज गायकवाडने 42 च्या सरासरीने आणि 131.25 च्या स्ट्राईक रेटने 210 धावा केल्या आहेत. 1 शतकही ऋतुराज गायकवाडच्या फलंदाजीतून आले आहे. ऋतुराज गायकवाड व्यतिरिक्त, एमएस धोनीने राजस्थान रॉयल्सविरुद्ध 24 डावात 2 अर्धशतकांसह 553 धावा केल्या आहेत. या दोघांव्यतिरिक्त, रवींद्र जडेजा राजस्थान रॉयल्सविरुद्ध 16 डावांमध्ये 245 धावा करण्यात आणि 21 डावांमध्ये 21 विकेट्स घेण्यात यशस्वी झाला आहे.

बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघांची कामगिरी

आम्ही तुम्हाला सांगतो की आतापर्यंत बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर पाच आयपीएल सामने खेळले गेले आहेत. या काळात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी दोन सामने जिंकले आहेत. तर, लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने दोन सामने जिंकले आहेत. एका सामन्याचा निकाल जाहीर झाला नाही. राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत या खेळपट्टीवर एकूण पाच सामने खेळले आहेत. या काळात राजस्थान रॉयल्सने फक्त एक सामना जिंकला आहे आणि तीन सामने गमावले आहेत. चेन्नई सुपर किंग्जने या मैदानावर एकही सामना खेळलेला नाही. चेन्नई सुपर किंग्ज संघाला या नवीन मैदानावर जिंकायचे आहे.