RR vs CSK IPL 2025 11th Match Winner Prediction: राजस्थान रॉयल्स की चेन्नई सुपर किंग्ज कोणता संघ आज होणार विजयी? वाचा मॅच प्रेडिक्शन रिपोर्ट
राजस्थानचे नेतृत्व तीन सामन्यासाठी रियान पराग करत आहे. तर, चेन्नईची कमान ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर आहे. या हंगामात, राजस्थानने दोन्ही सामने गमावले आहे. तर चेन्नईने एक सामना जिंकला आणि एक गमावला आहे. त्यामुळे दोन्ही संघासाठी आजचा सामना महत्वाचा आहे.
Rajasthan Royals vs Chennai Super Kings: इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) चा 11 सामना रविवारी 30 मार्च रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (Rajasthan Royals vs Chennai Super Kings) यांच्यात बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी येथे संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाणार आहे. या हंगामात, राजस्थानचे नेतृत्व तीन सामन्यासाठी रियान पराग करत आहे. तर, चेन्नईची कमान ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर आहे. या हंगामात, राजस्थानने दोन्ही सामने गमावले आहे. तर चेन्नईने एक सामना जिंकला आणि एक गमावला आहे. त्यामुळे दोन्ही संघासाठी आजचा सामना महत्वाचा आहे.
हेड टू हेड रेकाॅर्ड (CSK vs RR Head to Head)
आयपीएलच्या इतिहासात राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात एकूण 29 सामने खेळले गेले आहेत. या काळात, चेन्नई सुपर किंग्जने वरचढ कामगिरी केली आहे. चेन्नई सुपर किंग्जने 16 सामने जिंकले आहेत. तर, राजस्थान रॉयल्सने 13 सामने जिंकले आहेत. गेल्या हंगामात दोन्ही संघांमध्ये फक्त एकच सामना खेळला गेला होता आणि हा सामना चेन्नई सुपर किंग्जने 5 विकेट्सने जिंकला होता. राजस्थान रॉयल्सला यावेळी पुनरागमन करायचे आहे.
कोण जिंकणार आजचा सामना?
जर आपण या सामन्यातील विजेत्याबद्दल बोललो तर दोन्ही संघांची आकडेवारी आणि सध्याचा फॉर्म पाहता, लक्ष्याचा पाठलाग करणारा संघ सामना जिंकू शकतो. अशा परिस्थितीत नाणेफेकीची भूमिका खूप महत्त्वाची ठरेल. गेल्या सामन्यात सीएसकेला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी, राजस्थान रॉयल्स संघ त्यांना हलके घेण्याची चूक करणार नाही. तथापि, क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटले जाते. अशा परिस्थितीत या सामन्यात काहीही भाकित करणे कठीण आहे.
चेन्नई सुपर किंग्जच्या विजयाची शक्यता: 60%
राजस्थान रॉयल्सची जिंकण्याची शक्यता: 40%
दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर एक नजर
राजस्थान रॉयल्स: यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमायर, वानिंदू हसरंगा, आकाश माधवाल, महेश टिक्षणा, तुषार देशपांडे, संदीप शर्मा.
चेन्नई सुपर किंग्ज: रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), दीपक हुडा, सॅम करन, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, मथिशा पाथिराणा/मुकेश कुमार, खलील अहमद.
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

