India vs New Zealand 1st Test Weather Report: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ)यांच्यातील पहिली कसोटी 16 ऑक्टोबर बुधवारपासून सुरू होणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना बंगळुरूच्या दिग्गज चिन्नास्वामी स्टेडियमवर(Chinnaswamy Stadium) खेळवला जाईल. नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणाऱ्या बॉर्डर गावस्कर करंडक स्पर्धेसाठी भारतीय संघासाठी हा सामना महत्त्वपूर्ण आहे. मात्र, उभय संघात होणाऱ्या या सामन्यावर पावसाचे संकट उभे राहीले आहे. सध्या कर्नाकमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. हा पाऊस उद्याही असाच सुरू राहीला तर, सामना रद्द होण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे संपूर्ण भारतीयांच्या नजरा सामना आणि पाऊस यांच्यावर आहेत. (हेही वाचा: IND vs NZ 2024: न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज बेन सियर्स गुडघ्याच्या दुखापतीमुळे भारत दौऱ्यातून बाहेर; अनकॅप्ड जॅकब डफीचा संघात समावेश)
हवामानाचा अंदाज
AccuWeather ने नमूद केले की बंगळुरूमध्ये पावसाचे हवामान आहे. मंगळवारी दिवसभर पावसाची शक्यता आहे. कसोटीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच बुधवारी देखील पावसाची शक्यता आहे. बुधवारी पावसाची शक्यता 41 टक्के आहे. दुपारनंतर वादळी वारे वाहतील. असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.यापैकी 4 दिवस पावसाची शक्यता 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहे. कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी 41 टक्के, दुसऱ्या दिवशी 40 टक्के आणि तिसऱ्या दिवशी सर्वाधिक 67 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्याचवेळी, बेंगळुरु कसोटीत चौथ्या दिवशी 25 टक्के आणि पाचव्या दिवशी 40 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मंगळवारी सकाळपर्यंत गेल्या 24 तासांत शहरात 16 मिमी पावसाची नोंद झाली आहे. आयएमडीनं तुमकुरु, म्हैसूर, कोडागु, चिक्कमगालुरु, हसन, कोलार, शिवमोग्गा आणि चिक्कबल्लापूर जिल्ह्यांसाठी हवामानाचा 'यलो अलर्ट' जारी केला आहे. ही चेतावणी हवामानाची बिघडलेली स्थिती दर्शवते परिणामी येथील जनजीवन प्रभावित होऊ शकते.
चिन्नास्वामी स्टेडियमवरमधला पावसाचा व्हिडीओ
It's Raining heavily at the Chinnaswamy Currently. 🌧️
- Rain also predicted for all 5 days in first Test Match between India vs New Zealand...!!!! pic.twitter.com/XzwNOFoy6k
— Tanuj Singh (@ImTanujSingh) October 15, 2024
चिन्नास्वामी स्टेडियमवरमधला एक व्हिडीओ समोर आला आहे. जिथे स्टेडियमवरमधे पाऊस सुरू असल्याचे दिसत आहे. पाऊस पहिल्या कसोटी सामन्याच्या काळात पाचही दिवस असणार असल्याचा अंदाज आहे.
दोन्ही संघांचे खेळाडू
भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (विकेटकीपर), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (डब्ल्यूके), ध्रुव जुरेल (डब्ल्यूके), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मो. सिराज, आकाश दीप
न्यूझीलंड संघ: टॉम लॅथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल (फक्त पहिली कसोटी), मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, विल ओ'रुर्के, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिशेल सँटनर, बेन सियर्स, इश सोधी (केवळ दुसरी आणि तिसरी कसोटी), टीम साऊथी, केन विल्यमसन, विल यंग