किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या विरोधात रविवार खेळण्यात आलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल संघाचा अष्टपैलू खेळाडू राहुल तेवतियाने (Rahul Tewatia) आक्रमक खेळी करून चाहत्यांची मन जिंकली आहेत. कारण, फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेला राहुल सुरुवातील डगमगताना दिसला. मात्र, सामन्यातील अखेरच्या काही षटकात त्याने आपल्या खेळीचा गिअर बदलला आणि तुफान फलंदाजी करत आपल्या संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. यामुळे क्रिडाविश्वातील खेळांडू सह सर्वसामान्यदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून राहुलवर कौतूक करत आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून सोशल मीडियापासून लांब असणारा राहुल आता पुन्हा ट्विटरवर ऍक्टिव्ह झाला आहे. त्यानंतर राजस्थान संघाच्या अधिकृत ट्विटला रिप्लाई देत त्याने 'माफ करा, मला उशीर झाला', असे ट्विट करत चाहत्यांची माफी मागितली आहे.
पंजाब विरुद्ध सामन्यात राहुल तेवतिया ने शेल्डन कॉट्रेलच्या एका षटकात 5 षटकार ठोकले होते. सुरुवातील 19 चेंडूवर केवळ 8 धावा करणारा राहुल तेवतिया राजस्थानला विजय मिळवून देऊन, अशी कल्पनादेखील कोणी केली नव्हती. तेवतिया आक्रमक खेळीवरून राजस्थानच्या संघाने आपल्या ट्विटर हॅंडलचे बायो बदलून टाकले आहे. या सामन्यात राहुल तेवतियाने जे केले आहे. तेच वर्ष 2020 देखील करेल अशी आशा करतो, असे बायोमध्ये लिहण्यात आले आहे. हे देखील वाचा- Virat Kohli Trolled: मुंबई इंडियन्स विरुद्ध सामन्यात विराट कोहली याची निराशाजनक कामगिरी; सोशल मीडियावर मजेशीर मीम्स व्हायरल
ट्विट-
Der aaye durust aaye - as always 😁 https://t.co/GcB5Cgbujf
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) September 29, 2020
राहुल तेवतिया आक्रमक खेळीवर संजू संमसनने आपली प्रतिक्रिया दिली आहे. राहुल तेवतिया हा नेट्समध्ये असताना अनेक षटकार लावणारा खेळाडू आहे. यामुळे संघाला त्यांच्यावर विश्वास होता की, जर या सामन्यात तो टिकला तर अनेक षटकार पाहायला मिळतील असे तो म्हणाला आहे.