
Punjab Kings vs Delhi Capitals, TATA IPL 2025 66th Match Stats: इंडियन प्रीमियर लीग 2025 त्याच्या अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. या हंगामातील 66 वा सामना आज म्हणजेच 24 मे रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (PBKS vs DC) यांच्यात जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवला जात आहे. पंजाब किंग्ज संघाने प्लेऑफमध्ये आपले स्थान आधीच निश्चित केले आहे. तर, दिल्ली कॅपिटल्स स्पर्धेतुन बाहेर पडले असुन या हंगामातील शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. टॉप-2 मध्ये स्थान मिळवण्याच्या दृष्टिकोनातून पंजाब किंग्जसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. दरम्यान, दिल्लीने नाणेफेत जिंकूण गोलदांजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलदांजी करताना पंजाबसमोर 206 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Shreyas Iyer's fifty and Marcus Stoinis' quick-fire cameo help PBKS post a strong total of 206/8 in Jaipur ❤️🔥🏟️
Can PBKS defend this total and move to the top of the table? 🤔#IPL2025 #DCvPBKS #ShreyasIyer #Sportskeeda pic.twitter.com/0ZSHyxqawg
— Sportskeeda (@Sportskeeda) May 24, 2025
नाणेफेक गमावल्यानंतर, पंजाब किंग्ज प्रथम फलंदाजीसाठी उतरले आणि त्यांची सुरुवात निराशाजनक झाली आणि संघाला फक्त आठ धावांच्या धावसंख्येवर पहिला मोठा धक्का बसला. यानंतर, प्रभसिमरन सिंग आणि जोश इंग्लिस यांनी मिळून डावाची जबाबदारी घेतली आणि संघाचा धावसंख्या 50 धावांच्या पुढे नेली.
प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जच्या संघाने निर्धारित 20 षटकांत आठ गडी गमावून 206 धावा केल्या. पंजाब किंग्जकडून कर्णधार श्रेयस अय्यरने 53 धावांची शानदार खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, श्रेयस अय्यरने 34 चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकार मारले. श्रेयस अय्यर व्यतिरिक्त मार्कस स्टोइनिसने 44 धावा केल्या.
दुसरीकडे, स्टार वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानने दिल्ली कॅपिटल्सला पहिले मोठे यश मिळवून दिले. दिल्ली कॅपिटल्सकडून मुस्तफिजूर रहमानने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. मुस्तफिजूर रहमान व्यतिरिक्त कुलदीप यादव आणि विप्रज निगम यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाला 20 षटकांत 207 धावा कराव्या लागतील. दोन्ही संघांना हा सामना जिंकून स्पर्धेत दोन गुण मिळवायचे आहेत.