Cricket | Representational Image (Photo Credits: Pixabay)

महेश उर्फ बाबू नलावडे (Babu Nalawade ) याचा क्रिकेट ( Cricket)खेळताना मैदानावरच मृत्यू झाला आहे. मैदानावरच हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. तो 45 वर्षांचा होता. प्राप्त माहितीनुसार, पुणे (Pune) जिल्ह्यातील बोरी बुद्रुक येथील जाधववाडी गावात स्वर्गीय मयूर चषक क्रिकेट स्पर्धा सुरु होती. या वेळी ओझर संघ आणि जांबुत संघ यांच्यात क्रिकेट सामना सुरु असताना 17 फेब्रुवारी या दिवशी ही घटना घडली. या सामन्यात बाबू नलावडे हा फलंदाजी करत होता. नॉन स्ट्राईकला असताना अचानक तो खाली बसला आणि त्याच ठिकाणी त्याचा मृत्यू झाला.

सामना सुरु असताना अचानक घडलेल्या या प्रकाराणे मैदानावरील खेळाडू आणि पंचांनाही धक्का बसला. मैदानावरील खेळाडू आणि स्पर्धेच्या आयोजकांनी त्याला नारायणगाव येथील डॉ. राऊत यांच्या रुग्णालयात दाखल केले. परंतू, तत्पूर्वीच बाबू नलावडे यांचा मृत्यू झाला होता. घडल्या प्रकारामुळे राज्यातील क्रिडा विश्वाला जोरदार धक्का बसला आहे. (हेही वाचा, मैदानावर क्रिकेट खेळत असताना, हृदयविकाराच्या झटक्याने क्रिकेटपटूचा मृत्यू)

मुळचे जुन्नर तालुक्यातील धोलवड गावचे असलेल्या बाबू नलावडे यांचा जन्म मुंबईचा. ते मुंबईतच वाढले. राहायचेही मुंबईतच. परंतू, मूळ गाव असल्याने त्यांचे नेहमीच गावी येणे जाणे असायचे. मुंबईमध्यो कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन असल्याने ते गावी आले होते. गावी थांबून ते वर्क फ्रॉम होम करत असत.

सध्या ते सुट्टीसाटी गावी होते. तसेच, लहानपणापासून क्रिकेटची आवड असलेल्या नलावडे यांनी अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये भाग घेतला. त्या गाजवल्याही. पण, पुढे नोकरी लागल्याने त्यांचे नियमीत क्रिकेट खेळणे काहीसे कमी झाले. ते सध्या टाईम्स ऑफ इंडिया या पेपरमध्ये प्रिंटिंग डिपार्टमेंटला असिस्टंट मॅनेजर पदावर कार्यरत होते.