PBKS vs MI IPL 2021 Match 17: पंजाबचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय, ‘या’ 11 खेळाडूंसह मैदानात उतरणार मुंबईची पलटन
केएल राहुल आणि रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

PBKS vs MI IPL 2021 Match 17: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier Legaue) 17व्या सामन्यात पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आमने-सामने येणार आहेत. चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर हा सामना सांगणार आहे. आजच्या सामन्यात पंजाबचा कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) नाणेफेक जिंकली आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई संघाने आजच्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला नसून पंजाबने मुरुगन अश्विनच्या जागी रवि बिष्णोईचा (Ravi Bishnoi) समावेश केला आहे. गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा या मैदानावरील हा अखेरचा सामना असणार आहे. यापूर्वी मुंबईने चेपॉकवर खेळलेल्या 4 पैकी 2 सामन्यात विजय मिळवला आहे तर तितक्याच सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. (MI vs PBKS IPL 2021: पंजाब किंग्स संघासाठी ‘हे’ 3 खेळाडू ठरू शकतात गेम चेंजर, मुंबई इंडियन्स संघाकडून हिसकावतील विजयाचा घास!)

आजच्या सामन्यापूर्वी दोन्ही संघांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पंजाबला हैदराबादने पराभूत केलं, तर दिल्लीने मुंबईवर मात केली होती. दरम्यान, दोन्ही संघ यापूर्वी या प्रतिष्ठित स्पर्धेत एकूण 26 वेळा भिडले असून आकडेवारीनुसार दोन्ही संघ जवळपास एकमेकांच्या अनुरूप राहिले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने 14 सामन्यात विजय मिळवला असून पंजाबने 12 सामन्यात मुंबईच्या पलटनवर मात केली आहे. शिवाय, दोन्ही संघ आजच्या सामन्यातून विजय पथावर परतण्यासाठी उत्सुक असेल. पंजाब आणि मुंबई संघाला यापूर्वीच्या सामन्यात बॅटिंगमुळे पराभव पत्करावा लागला होता त्यामुळे आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारेल याकडे सर्वांचीच उत्सुकता लागून असेल.

पहा मुंबई-पंजाबचा प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या, किरोन पोलार्ड, जयंत यादव, राहुल चाहर, जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट.

पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन: मयंक अग्रवाल, केएल राहुल (कॅप्टन/विकेटकीपर), क्रिस गेल, निकोलस पूरन, दीपक हुड्डा, शाहरुख खान, मोईस हेनरिक्स, फॅबियन अ‍ॅलन, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह आणि मोहम्मद शमी.