IND vs AUS 2020: पॅट कमिन्स याचे KKR च्या फॅनने केले स्वागत, भेट म्हणून दिली एक खास गिफ्ट
पॅट कमिन्स (Photo Credit: Twitter/@KKRiders)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) च्या आगामी हंगामातील सर्वात महागड्या खेळाडू ठरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स (Pat Cummins) याला 2015 च्या आयपीएल (IPL) फ्रँचायझी जर्सी चाहत्याने भेट देत भारतात स्वागत केले. कमिन्सला यावर्षी कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) फ्रँचायझीने तब्बल 15.5 कोटी रुपयांमध्ये खरेदी केली. आयपीएलच्या इतिहासातीलतो सर्वात महागडा परदेशी खेळाडू बनला आहे. ऑस्ट्रेलियाचा कमिन्स सध्या भारताविरुद्ध वनडे मालिका खेळण्यासाठी आला असूनही त्याचे येथे जंगी स्वागत होत आहे. यापूर्वी वेगवान गोलंदाज कमिन्स कोलकाताकडून खेळला आहे. केकेआर (KKR) चाहत्याने 2015 जर्सी कमिन्सला त्याची जर्सी भेट दिली आहे, ज्यावर त्याचे नाव लिहिलेले आहे. कमिन्स 2014 आणि 2015 मध्ये कोलकाताकडून खेळला होता. चाहत्याने दिलेली केकेआरची ही जर्सी पाहून कमिन्स भावुक झाला आणि याने जुन्या आठवणी जागृत झाल्याचे त्याने म्हटले. (IPL 2020: आयपीएल लिलावातील पैशांचे पॅट कमिन्स काय करणार? ऑस्ट्रेलियन गोलंदाजाच्या गर्लफ्रेंडने सांगितलेला 'हा' पर्याय ऐकून तुमच्याही भुवया उंचावतील)

कमिन्सचा एक व्हीडीओ केकेआरने त्यांच्या अकाउंटवर शेअर केला. यामध्ये कमिन्स म्हणाला, "भारतात आल्यावर मला आनंद झाला आहे. मी येथे एका चाहत्यास भेटलो, ज्याने मला कोलकाताकडून 2015 ची जर्सी भेट दिली. याने जुन्या आठवणी परत जागृत केल्या आहेत. मी येत्या हंगामासाठी पूर्णपणे तयार आहे." कमिन्स म्हणाले, माझ्याकडे ईडन गार्डन्सच्या काही आठवणी आहेत. मी येथे एक युवा खेळाडू म्हणून बरेच क्रिकेट पाहिले आहे. मला हे स्टेडियम खूप आवडते." पाहा हा व्हिडिओ:

दरम्यान, भारताविरुद्ध मुंबईत झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात कमिन्सने दोन गडी बाद केले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने अष्टपैलू कामगिरी करत भारताचा 10 ने पराभव केला. मिशेल स्टार्क याने 3 गडी, तर केन रिचर्डसन आणि कमिन्सने 2 विकेट्स घेतल्या. मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील विजयानंतर ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली असून आता दोन्ही संघ रंजकोटमध्ये 17 जानेवारीला दुसऱ्या वनडे सामन्यात आमने-सामने येतील. ऑस्ट्रेलिया हा सामना जिंकून मालिका खिशात घालू पाहिलं, तर टीम इंडिया मालिकेत आव्हान कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.