पॅट कमिन्स (Photo Credit: Getty Images)

या महिन्याच्या सुरुवातीला इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) च्या लिलावात सर्वाधिक मोबदला मिळाल्यानंतर तो न बदलण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आणि अजूनही खेळाच्या प्रेमापोटी क्रिकेट खेळत असल्याचे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स (Pat Cummins) याने सांगितले. कोलकातामध्ये पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलसाठी (IPL) बोली लावण्याचे काम सुरू झाल्यानंतर कमिन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडी परदेशी खेळाडू ठरला. कोलकाता नाईट रायडर्सने ऑस्ट्रेलियाच्या या वेगवान गोलंदाजाला 15.5 कोटी रुपयांमध्ये विकत घेतले. आयपीएलच्या लिलावात मिळालेली ही दुसरी सर्वात मोठी रक्कम आहे. आयपीएल 2017च्या लिलावात इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सच्या 14.5 कोटींच्या लिलावाला कमिन्सने मागे टाकले. आयपीएलमध्ये मिळणाऱ्या या पैशातून त्याने काय करण्याची योजना आखली असल्याचे विचारले असताना कमिन्स म्हणाला की, त्याची गर्लफ्रेंड आनंदी आहे की ते त्यांच्या पाळीव कुत्र्यासाठी दोन आणखी खेळणी घेऊ शकतात. (IPL 2020 Auction: पॅट कमिन्स ठरला आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा परदेशी क्रिकेटर, युवा खेळाडूही झाले मालामाल)

"मला माहित नाही [पैशाचे काय करावे]. माझी गर्लफ्रेंड... ती पहिली गोष्ट म्हणाली होती की 'आम्ही आता आणखी दोन खेळणी आमच्या कुत्रासाठी विकत घेऊ शकतो. तिची प्राथमिकता क्रमवारीत मिळाली आहे, " मेलबर्न येथे बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी कमिन्सने पत्रकारांना सांगितले. दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलच्या लिलावात ऑस्ट्रेलियन खेळाडूंची चांदी झाली. ग्लेन मॅक्सवेल याला किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये 10.75 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. दरम्यान, मुंबई इंडियन्सने लिलावात चेन्नई सुपर किंग्जकडून कडक आव्हान उभे केले आणि नॅथन कूल्टर-नाईल याला 8 कोटींमध्ये खरेदी केले. ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंचला विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने 4.4 कोटींमध्ये विकत घेतले.

दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन संद्घ सध्या न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या टेस्टसाठी सज्ज होत आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये 26 डिसेंबरपासून दुसऱ्या टेस्ट सामन्याला सुरुवात होत आहे. 3 सामन्यांच्या टेस्ट मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे.