Deodhar Trophy 2019: पार्थिव पटेल याने युक्ती दाखवत जयदेव उनादकट याला अश्याप्रकारे केले Run Out की फलंदाजही झाला अवाक, पहा (Video)
पार्थिव पटेल, जयदेव उनादकट (Photo Credit: Twitter)

देवधर ट्रॉफी सामन्यात इंडिया बी (India B) संघाने इंडिया अ (India A) संघाला 108 धावांनी पराभूत केले. इंडिया ए कडून ऋतुराज गायकवाड आणि बाबा अपराजित यांनी शानदार शतकी खेळी करत संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. पण या सामन्यात एक अतिशय रंजक घटना घडली. यात यष्टीरक्षक पार्थिव पटेल (Parthiv Patel) याने टीम इंडियाचा विकेटकीपर महेंद्र सिंह धोनी याच्यासारखी स्फूर्ती आणि चातुर्य दाखवत फलंदाज जयदेव उनादकट (Jaydev Unadkat) याला धाव बाद केले. काही काळ उनादकटला कळलेच नाही की तो कसा बाद झाला. पटेलने ज्याप्रकारे उनाडकटला बाद केले त्याचीजोरदार चर्चा सोशल मीडियावर होत आहे. शाहबाझ नदीम याच्या गोलंदाजीवर उनाडकटने हलक्या हाताने शॉट खेळला. उनाडकटने शॉट खेळून नंतर बॉलवर लक्ष दिले नाही आणि याचा फायदा उचलत केदार जाधव (Kedar Jadhav) याने यष्टीरक्षक पार्थिवकडे बॉल फेकला आणि त्याने वेळ न घालवता स्टंपवरील बेल्स उडवले. यासाठी पार्थिवचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे तर उनाडकटची खिल्ली उडवली जात आहे. (Video: हरमनप्रीत कौर हिने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या ODI मध्ये पकडला आश्चर्यकारक एक हाती कॅच)

भारत ए संघाच्या डावात शाहबाझ नदीम याने 43 वी ओव्हर टाकत होता आणि उनाडकत फलंदाजी करत होता. नदीमच्या या ओव्हरमधील पाचव्या बॉलला उनाडकटने क्रीजच्य बाहेर येऊन बचावात्मक शॉट मारला. शॉट खेळत उनादकटने चेंडूवर लक्ष हटवले आणि क्रीजवरील कचरा साफ करू लागला. तो क्रीजच्या आत जाण्यापूर्वी केदारने विकेटकीपर पार्थिवकडे बॉल फेकला. पार्थिवनेही उत्कृष्ट पद्धतीने चेंडू कलेक्ट केला आणि वेळ न गमावत बेल्स उडवल्या. यानंतर, एकीकडे इंडिया बीचे खेळाडू विकेट गेल्याचा आनंद साजरा करत होते, उनाडकटला काय झाले ते समजले नाही. शॉट खेळल्यानंतर उनादकट सुस्त झाला होता, तर पार्थिवने धोनीप्रमाणेच युक्ती दाखवली आणि फलंदाजाला पॅव्हिलिअनच्या रास्ता दाखवला. पाहा याचा 'हा' व्हिडिओ:

या मॅचबद्दल बोलले तर, भारत अने निर्धारित 50 षटकांत 6 विकेट गमावून 302 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारत अ संघ 47.2 ओव्हरमध्ये 194 धावांवर ऑलआऊट झाला आणि भारत ए संघाने 108 धावांनी विजय नोंदवला.