भारतीय महिला टी-20 संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने पुन्हा एकदा प्रभावी कामगिरी करत चाहत्यांना प्रभावित केले. महिला संघ (India Women's Cricket Team) सध्या वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यावर आहे. आज दोन्ही संघात पहिला वनडे सामना खेळला गेला. दोन्ही संघातील आजचा सामना थरारक राहिला. यात विंडीज महिला संघाने 1 धावांनी विजय मिळवला. भारताकडून प्रिया पुनिया (Priya Punia) हिने 75 आणि जेमीमाह रॉड्रिग्ज (Jemimah Rodrigues) ने 41 धावांचे योगदान दिले. याविजयसह विंडीजने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. यासर्वांमधे सर्वात लक्षवेढी राहिली ती भारताची अष्टपैलू हरमनप्रीत कौर. पहिले फलंदाजी करत विंडीजने भारताला 225 धावांचे आव्हान दिले होते. स्टेफनी टेलर (Stafanie Taylor) हिने 94 धावा केल्या. डावाच्या अखेरच्या चेंडूवर शतक पूर्ण करण्याच्या हेतूने टेलरने षटकार मारला, पण हरमन लॉन्ग-ऑनच्या दिशेने डाव्या दिशेला धावत आली आणि वेळेत उडी मारत टेलरचा कॅच पकडला. (भारतीय महिला क्रिकेट संघ भत्त्याविना वेस्ट इंडिज दैऱ्यावर; BCCI नूतन समितीने तातडीने आर्थिक मदत पाठवल्याने नामुष्की टळली)
हरमनप्रीतच्या या कॅचमुळेस्टेफनीचे शतक हुकले. हरमनने डाव्या हाताने हा कॅच पकडत याला अधिक खास बनवले. कॅच पकडताच हरमनप्रीत जमिनीवर पडली परंतु तिने तिचे शरीर बाउंड्री लाईनला स्पर्श होऊ दिले नाही. हरमनप्रीतने मैदानावर असा असामान्य कॅच पकडणे हे तिच्या चाहत्यांसाठी काही नवीन नाही. मागील वर्षी मुंबईत इंग्लंडविरुद्ध पकडलेला अप्रतिम झेल क्रिकेट प्रेमींसाठी अजूनही खास आहे. पण, आजचा कॅच पकडत हरमनप्रीत याबाबतीत अजून एक पाऊल पुढे गेली आहे. पाहा या अप्रतिम कॅचची एक झलक:
Brilliant one handed blinder by Harmanpreet Kaur#WIWvINW #WIvIND pic.twitter.com/984lar0pGS
— Raj Nathwani🇮🇳 (@rajnatuu) November 1, 2019
दुसरीकडे, हरमनप्रीतचा कॅच संघासाठी काही बदल घडवू शकला नाही. वेस्ट इंडिजविरुद्ध आजच्या थरारक सामन्यात भारताला 1 धावने पराभव पत्करावा लागला. 226 धावांचा पाठलाग करताना भारत सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर 224 धावांवर बाद झाला. एकेवेळी भारताने 170 धावांवर2 विकेट गमावले असताना ते लक्ष्य गाठतील असे वाटत होते, पण नंतर 54 धावांवर 8 विकेटसह सामनाही गमावला. आता दोन्ही संघातील दुसरा वनडे सामना उद्या खेळला जाईल. या मॅचमध्ये भारताला विजय मिळवणे आवश्यक असेल.