भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) हिने 2010 मध्ये पाकिस्तानी (Pakistan) क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) याच्यासह विवाह बंधनात अडकली. यादरम्यान अनेक वाद देखील निर्माण झाले. सानियाला सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात आले आणि आताही ट्रोल केले जाते. पण या सर्व गोष्टींना मागे टाकत सानिया आपला पती शोएब सह वैवाहिक जीवनाचा आनंद लुटत आहे. दरम्यान, आता सानियानंतर अजून एक भारताची मुलगी पाकिस्तानची सून बनणार आहे. हरियाणाच्या नूंह भागात राहणारी शामिया आरजू (Shamia Arzoo) ही पाकिस्तान क्रिकेटरपटू सोबत निकाह करण्यास सज्ज आहे. पाकिस्तानचा जलद गोलंदाज हसन अली (Hasan Ali) सोबत शामिया पुढच्या महिन्यांत विवाहबंधनात अडकणार आहे. झहीर अब्बास आणि मोहसीन हसन खान यांच्या पत्नी देखील भारतीय आहेत. (सरफराज अहमद याच्या हातून निसटणार Pakistan टेस्ट टीमचे कर्णधार पद, जाणून घ्या कोण होणार नवीन कर्णधार)
पाकिस्तानच्या पंजाब (Punjab) प्रांतात जन्मलेला हसन अली आणि हरियाणा (Haryana) ची निवासी शामिया यांचा विवाह दुबईच्या (Dubai) एटलांटिस पाम जुबेरा पार्क हॉटेल (Atlantis Palm Hotel) मध्ये होणार आहे. शामिया एअर आमीरातमध्ये फ्लाईट इंजिनिअर आहे. हिंदी वृत्तपत्र अमर उजालाने दिलेल्या माहितीनुसार, शामिया आणि कुटुंबातील 10 सदस्य 17 ऑगस्टला दुबईसाठी रवाना होतील. अमर उजालामधील वृत्तानुसार शामियाचे वडील, लियाकत अली म्हणाले की, "मुलीचे लग्न तर करायचे आहे तर मुलगा भारताचा असो किंवा पाकिस्तानचा, याचा काही फरक पडत नाही. ते म्हणाले की, फाळणीनंतर त्यांचे नातेवाईक पाकिस्तानात गेले, ज्यांच्याशी त्यांचा अजून संपर्क आहे. शामिया आणि हसन यांचे जुने पारिवारिक संबंध आहेत. शामियाचे वडील लियाकत यांनी सांगितले की पाकिस्तानचे माजी खासदार सरदार तुफैले आणि त्यांचे बाबा सख्खे भाऊ होते. फाळणीनंतर त्यांचा कुटुंब भारतात स्थानिया झाला. तर, तुफैले सहकुटुंब पाकिस्तानमध्ये स्थानिय झाले. त्यांचा कुटुंब सध्या पाकिस्तानच्या कसूर जिल्ह्यातील काची कोठी नईयाकी येथे राहतात.
हसनने 2013मध्ये स्थानिक क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. त्यानंर 2016 मध्ये त्याने पाकिस्तानकडून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2017 च्या चॅम्पियन ट्रॉफी संघातही त्याचा समावेश करण्यात आला होता. हसनने आजवर वनडे क्रिकेटमध्ये 50 विकेट घेतल्या आहेत.