Pakistan Women National Cricket Team vs New Zealand Women National Cricket Team Dream11 Team Prediction: 2024 च्या आयसीसी महिला टी 20 विश्वचषक (Women’s T20 World Cup 2024) स्पर्धेतील 19 वा सामना पाकिस्तान महिला संघ विरुद्ध न्यूझीलंड महिला संघ यांच्यात आज म्हणजेच 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे. उभय संघांमधला हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल. टी 20 विश्वचषकात पाकिस्तान संघ आतापर्यंत तीन सामने खेळला आहे. ज्यामध्ये एकात विजयाची नोंद झाली आहे. तर 2 मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अशा परिस्थितीत, उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी, पाकिस्तान संघ न्यूझीलंडला (PAK vs NZ) मोठ्या फरकाने पराभूत करण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, न्यूझीलंड संघाने टी-20 विश्वचषकात आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. ज्यात 2 सामन्यांमध्ये विजयाची नोंद झाली आहे. तर एकात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अशा परिस्थितीत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी न्यूझीलंड संघाला पाकिस्तानविरुद्ध तिसरा विजय नोंदवायचा आहे. (हेही वाचा: Pakistan Women vs New Zealand Women, 19th Match Pitch Report: दुबईच्या खेळपट्टीवर कोणाचे असणार वर्चस्व; फलंदाज की गोलंदाज ठरणार वरचढ? जाणून घ्या पिच रिपोर्ट)
महिला टी 20 विश्वचषक 2024 मध्ये, दुबईमध्ये आत्तापर्यंत अर्ध्याहून अधिक सामने खेळले आहेत. त्यातील 37.5% सामने संघाने लक्ष्याचा पाठलाग करताना जिंकले आहेत. या मैदानावर प्रथम फलंदाजी करणे हा एक चांगला पर्याय असल्याचे यावरून दिसून येते. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
यष्टीरक्षक संघात कोणाचा समावेश करावा?
विकेटकीपर म्हणून तुम्ही पाकिस्तानच्या मुनिबा अली हिलाला संघात ठेवू शकता. याशिवाय तुम्ही तुमच्या ड्रीम 11 टीममध्ये न्यूझीलंडच्या इसाबेला गेजचाही समावेश करू शकता.
पाकिस्तान महिला वि न्यूझीलंड महिला ड्रीम11 अंदाज: अष्टपैलू आणि गोलंदाज
दोन्ही संघांत अष्टपैलू खेळाडूंची संख्या बऱ्यापैकी आहे. अमेलिया केर एक चांगला पर्याय असेल. ती गोलंदाजी आणि फलंजादी दोन्हींमध्ये चांगली कामगिरी करू शकेल. ती अनुभवी खेळाडू देखील आहे. याशिवाय कर्णधार सोफी डिव्हाईन आणि लेह कास्परेक हे चांगले पर्याय असतील. पाकिस्तानकडून निदा डीर आणि फातिमा सना हे चांगले पर्याय आहेत. याशिवाय रोझमेरी मायर, इडन कार्सन, ली ताहुहू, सादिया इक्बाल आणि सय्यदा अरुब शाह या गोलंदाजांना उत्तम साथ देऊ शकतात.
सर्वोत्तम ड्रीम 11 संघ
यष्टिरक्षक : मुनिबा अली, याशिवाय इसाबेला गेजचाही पर्याय आहे. (तुमच्या आवडीनुसार तुम्ही या दोघींपैकी एका खेळाडूला संघात घेऊ शकता. मग त्या स्थितीत तुम्ही तुमच्या संघात आणखी एका अष्टपैलू खेळाडूचा समावेश करू शकाल)
फलंदाज: सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर (सिद्रा अमीन, आलिया रियाझ आणि मॅडी ग्रीन तुमच्या आवडीनुसार बदल करू शकतात)
अष्टपैलू: अमेलिया केर, सोफी डिव्हाईन, लेह कास्परेक, फातिमा सना, ओमामा सोहेल यांची निवड करू शकता.
गोलंदाज: रोझमेरी मायर, ईडन कार्सन/सादिया इक्बाल आणि ली ताहुहू यांची निवड करू शकता.
कर्णधार आणि उपकर्णधार: अमेलिया केर (कर्णधार), रोझमेरी मायर/सोफी डिव्हाईन (उपकर्णधार) यांची निवड करू शकता.
संभाव्य सर्वोत्तम प्लेइंग 11 संघ
पाकिस्तान महिला संघ: मुनिबा अली (विकेटकीपर/कर्णधार), सिद्रा अमीन, सदफ शमास/इरम जावेद, निदा दार, आलिया रियाझ, फातिमा सना, ओमामा सोहेल, तुबा हसन, सादिया इक्बाल, नशरा संधू, सय्यदा अरुब शाह.
न्यूझीलंड महिला संघ: सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डिव्हाईन (कर्णधार), मॅडी ग्रीन, ब्रुक हॅलिडे, इसाबेला गेज (विकेटकीपर), ली ताहुहू, लेह कास्परेक, रोझमेरी मायर, ईडन कार्सन.