PAK vs SL मॅचदरम्यान कोलहीच्या पाकिस्तानी चाहत्याकडून 'विराट' निमंत्रण म्हणाला 'पाकमध्ये येऊन खेळ';  भारतीय क्रिकेटप्रेमिंनी सोशल मीडियावर केले कौतुक
समर्थकाद्वारे विराट कोहलीला पाकिस्तानमध्ये खेळण्याचे आमंत्रण (Photo Credits: IANS)

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. विराट अवघ्या 30 वर्षांचा आहे आणि आतापासून त्याने क्रिकेटचे सर्व मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. त्याचे चाहते केवळ भारतातच नव्हे तर जगातील बर्‍याच भागांत मोठ्या संख्येत आहेत. लोकांना त्याच्या फलंदाजीची शैली तसेच त्याचे व्यक्तिमत्त्व, खेळासाठी समर्पण आणि तंदुरुस्ती आवडते. पाकिस्तानच्या (Pakistan) लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर श्रीलंका (Sri Lanka) विरुद्ध टी-20 सामना खेळला जात होता, पण सामन्यादरम्यान, स्टेडियममध्ये असे दृश्य दिसले ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गद्दाफी स्टेडियमवरील मॅचदरम्यान जेव्हा कॅमेराची नजर त्या चाहत्यापडली तेव्हा सर्वजण त्याच्याकडे पाहू लागले. कोहलीचा हा चाहता हातात एक साइनबोर्ड घेऊन उभा होता, ज्यावर असे लिहिले होते की, 'विराट कोहली' आम्हाला तुम्हाला पाकिस्तानात खेळताना पाहायचे आहे. आम्ही तुमच्यावर प्रेम करतो आणि मी तुमचा खूप मोठा चाहता आहे." ('Run-Machine' विराट कोहली याच्यासारखा दिसणारा पुणेचा 'हा' युवा बनला रातोरात स्टार; दोन हवालदार करतात सुरक्षा)

कोहलीच्या या पाकिस्तानी चाहत्याचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि लोकांनी ज्या पद्धतीने त्याचं कौतुक केलं हे पाहण्यासारखेच होते. भारतीय चाहत्यांनी त्याला सभ्य पद्धतीने प्रतिक्रिया दिली. काहींनी आश्वासन दिले आहे की विराट लवकरच पाकिस्तानात खेळताना दिसेल, तर काहींनी पाकिस्तानला सल्ला दिला आहे आणि म्हटले आहे की आम्ही तुमच्या भावनांचे कौतुक करतो पण तुम्ही दहशतवाद रोखल्याशिवाय असे होणार नाही.

आशा आहे, लवकरच माझा मित्र. आम्हाला भारतात पाकलाही खेळताना पहायाला आवडेल

सुंदर जेस्चर

तुझे स्वप्न साकार होऊ दे

2012/13 पासून दोन्ही संघांनी द्विपक्षीय मालिका खेळली नाही. त्यावर्षी, पाकिस्तानी संघ वनडे आणि टी-२० मालिकेसाठी भारतात आला होता. तीन वर्षांनंतर त्यांनी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठीही भारत दौरा केला होता. आयसीसी स्पर्धा आणि आशिया चषकांमध्ये पाकिस्तान आणि भारत आता एकमेकांच्या आमने-सामने येत असतात. दरम्यान, तब्बल दोन वर्षाच्या विश्रांतीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटने पाकिस्तानात पुनरागमन केले. 2009 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीलंका संघाने पहिल्यांदा पाकिस्तानचा दौरा केला.