PAK vs SL: हसन अली याच्योसबतच्या मैत्रीबद्दल विचारताच शादाब खान याने उत्तरादाखल दिलेल्या प्रतिक्रियेत टाकली गुगली (Video)
हसन अली आणि शादाब खान (Photo Credit: Getty)

पाकिस्तानचा युवा फिरकीपटू शादाब खान (Shadab Khan) आणि वेगवान गोलंदाज हसन अली (Hasan Ali) एकमेकांचे चांगले सहकारी आहेत. दोघेही खूप चांगले मित्र आहेत आणि क्रिकेटच्या मैदानाबाहेरदेखील एकत्र दिसतात. सोशल मीडियावर त्यांची मैत्री दिसून येते. हसन अली याचा श्रीलंका (Sri Lanka) विरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठीच्या पाकिस्तान (Pakistan) संघात समावेश केला गेला नाही, तर शादाब खान संघाचा एक भाग आहे. बॅक स्ट्रेनमुळे हसनला मालिकेला मुकावे लागले आहे. शुक्रवारी पाक आणि श्रीलंका संघात पहिला वनडे सामना कराचीमध्ये होणार होता. पण, सतत पडणाऱ्या पावसामुळे मालिका पुढे ढकलण्यात आली. दोन्ही संघातील वनडे मालिका 30 सप्टेंबर, दुसऱ्या मॅचपासूनसुरु होणार आहे. यातील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. दुसऱ्या मॅचआधी रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकार परिषदेत शादाबला हसनबद्दल प्रश्न विचारला गेला. (PAK vs SL 1st ODI: श्रीलंकाविरुद्ध कराचीमध्ये पावसामुळे टॉसला विलंब, Netizens ने भारताला धरले जबाबदार)

कराची येथे पहिल्या वनडे मॅचआधी एका पाकिस्तानी पत्रकारने त्याला त्यांच्या दोघांच्या मैत्रीबद्दल प्रश्न विचारला गेला, ज्याला शादाबने गुगली टाकली आणि एक मजेदार उत्तर दिले. शादाबला त्याच्या मित्राशिवाय खेळताना कसे वाटत आहे, असे विचारले गेले. यावर शादाबने एक गमतीशीर उत्तर दिले ज्यामुळे सर्वांनाच हसू फुटले. शादाब म्हणाला की 'आम्ही दोघे मित्र आहेत, तुम्ही तर आम्हाला नवरा-बायकोच बनवत आहात.' शादाबचे हे उत्तर ऐकताच पत्रकार परिषदेत उपस्थित सर्व लोकांना हसू अनावर झाले. आजचा सर्वोत्तम दिवस होता, असं शादाबच्या उत्तरावर एका पत्रकारने टिप्पणी दिली.

दरम्यान, पाकिस्तानमध्ये बर्‍याच काळानंतर कोणताही आयसीसी टेस्ट खेळणारा संघ खेळत आहे. 2009 मध्ये पाकिस्तानच्या कराची येथील गद्दाफी स्टेडियमजवळ श्रीलंका क्रिकेट संघाच्या खेळाडूंच्या बसवर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. यात कोणाचा मृत्यू झाला नसला तरीही अनेक खेळाडू गंभीरपणे जखमी झाले होते. अशा परिस्थितीत पाकिस्तानचे घरगुती सामने दुबईत खेळवण्यात आले होते. श्रीलंकापूर्वी झिम्बाब्वे संघाने पाकिस्तानमध्ये मालिका खेळली होती. भेट दिली. दुसरीकडे, श्रीलंकेने पाकिस्तानविरुद्ध 3 वनडे आणि 3 टी-20 सामन्यांसाठी संघ पाठवला आहे. त्याअंतर्गत वनडे कराची आणि टी-20 लाहोरमध्ये खेळले जातील.