कराची राष्ट्रीय स्टेडियम (Photo Credit: YouTube)

तब्बल 10 वर्षाने क्रिकेट पाकिस्तानचा (Pakistan) धर्तीवर परतला आहे. 2009 मध्ये श्रीलंका क्रिकेट (Sri Lanka Cricket) टीमच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्या आयसीसी टेस्ट खेळणारा संघ पाकिस्तानात पोहचला आहे. त्या हल्ल्यात कोणताही खेळाडू मारला गेला नाही, परंतु बरेच जण जखमी झाले होते. दहशतवादी हल्ल्याच्या 10 वर्षानंतर श्रीलंका संघ पाकिस्तानविरुद्ध वनडे आणि टी-20 मालिकेसाठी इथे पोहचला आहे. 2009 मध्ये लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला कोणताही संघ विसरला नसला तरी नुकत्याच झालेल्या मालिकेदरम्यान झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा धोका देखील खेळाडूंच्या कपाळावर चिंतेची रेषा आणेल. दरम्यान, आज पासून सुरु होणाऱ्या वनडे मालिकेतील पहिल्या मॅचला पावसामुळे विलंब होत आहे. दोन्ही संघात अजून टॉसही झाला नाही. (IND vs PAK: टीम इंडिया आणि पाकिस्तान संघात द्विपक्षीय मालिकेबाबत CoA अध्यक्ष विनोद राय यांनी के 'हे' विधान)

पाकिस्तान आणि श्रीलंका संघातील पहिला वनडे कराचीमध्ये खेळला जाणार आहे. कराचीमध्ये काही वेळापासून जोरदार पाऊस पडत असल्याने टॉसला उशीर झाला आहे. तर, सोशल मीडियावर चाहत्यांनी स्वतःचे मनोरंजन करण्याचा एक चांगला प्रकार शोधला आहे. ट्विटरवर काही यूजर्सने पाऊस पाडण्यासाठी भारताला (India) जबाबर धरले आहे तर, काहींनी म्हटले पूर्ण वर्ष कराचीमध्ये पाऊस पडत नाही पण क्रिकेटच्या वेळी बरोबर पाऊस पडतो. पहा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया:

पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका वनडे सामना रोखण्यासाठी कराचीला पाऊस पाठविण्याची जबाबदारी भारतीयांची आहे

क्रिकेट परत येण्याच्या खुशीत, कराची पण रडला

कोणालाही #PAKvSL मध्ये रस नाही

भारत जळालेला दिसत आहे...

2009 मध्ये दहशतवादी हल्ल्याच्या सहा वर्षानंतर पाकिस्तानमध्ये कोणताही आंतरराष्ट्रीय सामना झाला नाही. आता, श्रीलंकाविरुद्ध पाकिस्तान तीन वनडे आणि तीन टी -20 सामने खेळेल. या मॅचमध्ये पाकिस्तान संघ सरफराज अहमद आणि श्रीलंकेचा संघ लाहिरू थिरिमाने यांच्या नेतृत्वाखालील सामना खेळेल. आयसीसी क्रिकेट विश्वचषकमध्ये दोन्ही संघाने निराशाजनक प्रदर्शन केले. पाकिस्तानचा संघ पाचव्या क्रमांकावर राहीला तर श्रीलंकेची स्थिती तर अधिकच वाईट होती. विश्वचषकानंतर पाकिस्तानी संघ पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार आहे, तर श्रीलंका यापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध टेस्ट आणि टी-20 मालिका खेळली आहे.