सचिन तेंडुलकर (Photo Credit: Getty Images)

पाकिस्तान (Pakistan) संघाने वर्ल्ड कपसाठी (World Cup) त्यांच्या खेळाडूंची घोषणा केली आहे. तर सलामी फलंदाज आबिद अली (Abid Ali) या वर्ल्ड कपचे सामने सुरु होण्यापूर्वी सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) ह्याचा सल्ला घेणार आहे. तसेच सचिन ह्याची गळाभेट घेण्याची आबिद अली ह्याची फार इच्छा आहे.

या 31 वर्षीय खेळाडूने आपल्या देशातल्या मैदानवार उत्तम कामगिरी केली आहे. तसेच गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुबईत झालेल्या सामन्यात त्याने शतकपूर्ती केली आहे. त्यानंतर आता वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासाठी आबिद अली खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.(हेही वाचा-Cricket World Cup 2019: आयसीसी वर्ल्ड कप सर्व संघ आणि खेळाडूंची नावे; पाहा कोणाकोणाला मिळाली संधी)

आबिद अली ह्याला सचिन तेंडूलकरच्या भेटीचे कारण विचारले असता त्याने असे म्हटले आहे की, माझी सचिनला भेटण्याची खुप इच्छा आहे. तसेच सगळ्या खेळाडूंना जसा सचिन भेटतो तसे तो मला सुद्धा भेटेल अशी अपेक्षा आहे. तर सचिन सोबतची भेट ही कायमस्वरुपी लक्षात राहील असे सुद्धा आबिद अली ह्याने म्हटले आहे.