सचिन तेंडुलकर (Photo Credit: Twitter/ICC)

27 मार्च 1994 हा क्रिकेटसाठी ऐतिहासिक दिवस ठरला. 26 वर्षांपूर्वी या दिवशी, वनडे क्रिकेटमध्ये भारताला असा सलामी फलंदाज सापडला ज्याला आज आपण मास्टर-ब्लास्टर म्हणून ओळखतो. होय, आजच्या दिवशी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने ओवेड्या क्रिकेटमध्ये पहिल्यांदा सलामी फलंदाज म्हणून खेळण्यास सुरुवात केली. वनडे कारकिर्दीतील 70 व्या सामन्यात सचिनला डावाची सुरुवात करण्याची संधी मिळाली, ज्याचा त्याने पुरेपूर फायदा करून घेतला. यानंतर, त्याने एकामागून एक विक्रम नोंदविला. आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये सलामी फलंदाज म्हणून सचिनला मैदानात उतरवण्याचा निर्णय भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन (Mohammad Azharuddin) यांनी घेतला होता. 1994 च्या न्यूझीलंड (New Zealand) दौऱ्यादरम्यान टीम इंडियाचा नियमित सलामी फलंदाज नवजोत सिंह सिद्धूला मानेला दुखापतीनंतर सचिनला डावाची सुरूवात करण्यासाठी पाठवण्यात आले. सचिनलाही हेच हवे होते, यासाठी त्याने कर्णधार अझरुद्दीन आणि व्यवस्थापक अजित वाडेकर यांच्याकडेही अपील केले होते. (On This Day! विराट कोहली ने आजच्या दिवशी केला होता कहर, ऑस्ट्रेलिया झाला होता Out, पाहा किंग कोहलीच्या धमाकेदार डावाचा हा Video)

या दौऱ्यावर सचिन पहिल्यांदा भारतीय संघासाठी सलामीला आला आणि सलामी फलंदाज म्हणून पहिल्यांदाच त्याने एक तुफानी डाव खेळला. या सामन्यात सचिनने आजार जडेजाबरोबर पहिल्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी केली, त्यानंतर जडेजा 18 धावांवर बाद झाला. सचिनने 42 चेंडूत 89 धावा केल्या. या खेळीत त्याने 15 चौकार आणि दोन षटकार लगावले आणि संघाच्या विजयाचा पाया रचला. यजमान न्यूझीलंडने टॉस जिंकून पहिले फलंदाजी केली आणि 142 धावांवर ऑलआऊट झाला. 143 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारताने 23.2 ओव्हरयामध्ये 7 विकेट गमावून लक्ष्य गाठले आणि विजय मिळवला. सचिनला त्याच्या तुफानी डावासाठी सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. या स्फोटक डावामुळे सचिनला मालिकेच्या उर्वरित दोन सामन्यांमधेही डावाची सुरुवात करण्याची संधी मिळाली. या सामन्यापूर्वी सचिन मधल्याफळीत खेळायचा.

या मॅचनंतर सलामी फलंदाज म्हणून सचिनच्या नावावर अनेक विश्वविक्रम नोंदवले गेलेत. 463 आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यांच्या कारकीर्दीत सचिनने 340 डावात सलामीवीर म्हणून फलंदाजी केली आणि 48.29 च्या सरासरीने 15,310 धावा केल्या. कोणत्याही ओपनरने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात इतके धावा केलेल्या नाहीत. मात्र, सचिनने वनडे सामन्यात एकूण 18,426 धावा केल्या आहेत.