विराट कोहली (Photo Credit: Getty Images)

विरोधी संघाच्या गोलंदाजांची क्लास घेतण्यात विराट कोहली (Virat Kohli) पटाईत आहे. आपल्या आजवरच्या कारकिर्दीत 'रन मशीन'ने असे डाव खेळलेत ज्यात भारताने विजय मिळवला आहे. चार वर्षांपूर्वी मोहालीमध्ये ऑस्ट्रेलियाचे आव्हान मोडून काढण्यासाठी खेळेल नाबाद 82 धावांचा डाव त्याचे चाहते कधीच विसरणार नाहीत.  2016 च्या टी-10 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) 27 मार्च रोजी मोहालीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध जेव्हा कोहलीने बॅटने कहर केला. कोहलीच्या त्या अमूल्य डावाच्या जोरावर भारताने (India) त्या टी-20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. सर्वात महत्वाचे म्हणजे भारताविरुद्ध त्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचे (Australia) वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आले होते. आयसीसीनेही (ICC) कोहलीच्या खेळीची आठवण करुन दिली असून त्याच्या फलंदाजीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. (श्रेयस अय्यर याने केला खुलासा; 'हे' 5 खेळाडू आहेत आदर्श, विराट कोहली कठोर तर रोहित शर्मा-एमएस धोनी यांचे केले जोरदार कौतुक)

विराटच्या धमाकेदार डावाचा व्हिडिओ शेअर करत आयसीसीने कॅप्शनमध्ये लिहिले की, "आजच्या दिवशी 2016 मध्ये विराट कोहलीने हे केले..." कोहलीने 51 चेंडूत 82 धावांची खेळी केली आणि त्यामध्ये दोन षटकार आणि 9 चौकारांचा समावेश होता. 'मॅन ऑफ द मॅच' विराटने धोनीबरोबर 5 व्या विकेटसाठी 67 धावांची नाबाद भागीदारी केली आणि भारताच्या विजयात महतवाची भूमिका बजावली. दरम्यान, हा सामना कोहली विसरला नाही आणि मागील वर्षी सप्टेंबरमध्ये माजी कर्णधार धोनीसोबतचा फोटो शेअर करत या सामन्याची आठवण काढली. त्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केले असून, यात दोघे सामना जिंकल्यावर क्रीजवर असल्याचे दिसत आहेत.

भारत-ऑस्ट्रेलियामधील त्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 160 धावांवर रोखले. प्रत्युत्तरात भारताने 49 धावांवर तीन गडी गमावले. शिखर धवन 13, रोहित शर्मा 12 आणि सुरेश रैना 10 धावा करून माघारी परतले होते. तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या विराटने जखमी युवराज सिंहसोबत 45 धावा जोडल्या, मात्र अंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारताच्या धावा रोखल्या. 94 धावांवर भारताने 4 गडी गमावले. शेवटच्या चार षटकांत भारताला विजयासाठी 47 धावांची आवश्यकता असताना विराटसह एमएस धोनी खेळपट्टीवर खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर जेम्स फॉकनर आणि नाथन कल्टर-नील 35 धावा लुटवल्या. त्या सामन्यात फिनिशर धोनीने शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर चौकारांसह भारताला विजय मिळवून दिला.