श्रेयस अय्यर याने केला खुलासा; 'हे' 5 खेळाडू आहेत आदर्श, विराट कोहली कठोर तर रोहित शर्मा-एमएस धोनी यांचे केले जोरदार कौतुक
श्रेयस अय्यर आणि विराट कोहली (Photo Credit: Getty)

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) विश्वातील अन्य खेळांसह क्रिकेटवरही ब्रेक लागला आहे. सर्व खेळाडू आपला वेळ कुटुंबासमवेत घरी घालवत आहेत. तथापि, घरी विश्रांती घेताना टीम इंडियाचे खेळाडू आपल्या चाहत्यांशी जोडलेले आहेत आणि ते सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. टीम इंडियाच्या मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरही (Shreyas Iyer) गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अधिक सक्रिय दिसत आहे, त्याचे फोटो आणि व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहेत. बुधवारी श्रेयसने त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला आणि टीम इंडियाच्या खेळाडूंसह स्वतःबद्दल काही गोष्टींचा खुलासा केला. विराट कोहलीसह (Virat Kohli) सचिन तेंडुलकर, केविन पीटरसन, एबी डीव्हिलियर्स आणि रोहित शर्मा हे त्याचे आदर्श असल्याचे श्रेयस म्हणाला तर विद्यमान भारतीय कर्णधार विराटला त्याने 'कठोर' म्हटले. (लॉक डाऊनच्या काळात हार्दिक पंड्या आणि गर्लफ्रेंड नताशा स्तांकोविक असा व्यतीत करत आहेत वेळ; Romantic फोटो पाहून चाहते फिदा)

#AskShreyas दरम्यान जेव्हा एका चाहत्याने श्रेयसला ट्विटरवर विराटबद्दल एक शब्द वापरण्यास सांगितले तेव्हा तो म्हणाला-कठोर. दुसऱ्याने श्रेयसला त्याचे आदर्श कोण विचारले असताना त्याने सचिन तेंडुलकर, एबी डिव्हिलियर्स, केव्हिन पीटरसन, रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा उल्लेख केला. अय्यरने जेमीमाह रॉड्रिग्जला त्याची आवडती महिला क्रिकेटपटू म्हणूनही निवडले. अय्यरने एमएस धोनी आणि रोहित शर्मा यांचेही कौतुक केले. श्रेयसने धोनीचं खरा नेते म्हणून वर्णन केले आणि म्हणाला, "धोनी शांत आणि अस्सल नेता आहे." दुसरीकडे, रोहितबद्दल तो म्हणाला, "रोहितचे व्यक्तिमत्व अप्रतिम आहे. तो प्रेरणादायक आहे आणि संघातील खेळाडूंची देखील काळजी घेतो."

जेमीमाह रॉड्रिग्ज: निर्भय

विराट कोहली: कठोर

रोहित शर्मा: खूप प्रेरक

धोनी: मस्त, शांत

जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसचा भारतात होणार प्रसार थांबवण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाउन देश पाळत आहे. या व्हायरसने भारतात आजवर 10 जणांचा बळी घेतला आहे. यामुळे भारतासह अन्य देशांमध्ये आयोजित होणाऱ्या क्रीडा स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या लॉकडाउनमुळे यंदा इंडियन प्रीमिअर लीगचे (आयपीएल) आयोजन एप्रिल अखेरीस होणे कठीण दिसत आहे. 29 मार्चपासून सुरु होणारी स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली होती.