लॉक डाऊनच्या काळात हार्दिक पंड्या आणि गर्लफ्रेंड नताशा स्तांकोविक असा व्यतीत करत आहेत वेळ; Romantic फोटो पाहून चाहते फिदा
Natasa Stankovic and Hardik Pandya (Image Credit: Instagram)

सध्या संपूर्ण देश कोरोना व्हायरस संकटाच्या छायेखाली वावरत आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या घटना पाहता चित्रपट निर्मिती, खेळांचे सामने, व्यवसाय बंद करण्यात आले आहेत. त्यात आता देशात 21 दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. 21 दिवस हा तसा फार मोठा कालावधी आहे, अशा काळात घरी बसून नक्की काय करायचा हा प्रश्न अनेकांना पडला असेल. अनेकजण आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत हे दिवस व्यतीत करत असतील. असाच हार्दिक पंड्याही (Hardik Pandya) आपल्या खास व्यक्तीसोबत, नताशा स्तांकोविक (Natasa Stankovic) हे विलगीकरणामधील दिवस घालवत आहे.

नटाशा स्टँकोव्हिकने आपल्या इंस्टाग्रामवर हार्दिक पंड्या सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघेही आपल्या कुत्र्यासोबत बेडवर निवांत पहुडलेले दिसत आहेत. या खास फोटो शेअर करत नटाशाने कोरोना विषाणूच्या या प्रसंगी सर्वांनी सुरक्षित रहाण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून नटाशा आणि हार्दिक एकमेकांना डेट करत आहेत. मात्र अचानक त्यांच्या साखरपुड्याची बातमी आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. नटाशा मुंबईमधील एक सर्बियन अभिनेत्री, मॉडेल आणि डान्सर आहे. प्रकाश झा दिग्दर्शित ‘सत्याग्रह’तून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. (हेही वाचा: "माझे शहर असे दिसेल कधी वाटले नाही", COVID-19 मुळे कोलकाता लॉक डाउन पाहून सौरव गांगुली झाला भावुक)

 

View this post on Instagram

 

#stayhomestaysafe #quarantine @hardikpandya93

A post shared by Nataša Stanković✨ (@natasastankovic__) on

बर्‍याच काळापासून क्रिकेटपासून दूर असलेला हार्दिक पांड्या, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत परतणार होता. मात्र कोरोना व्हायरसमुळे ही मालिका रद्द केली गेली, ज्यामुळे त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले नाही. आता यावेळी आयपीएल (IPL) देखील संशयाच्या भोवऱ्यात आहे. या कोरोना व्हायरस संकटामध्ये टीम इंडियाचे सर्व खेळाडू आपल्या कुटुंबियांसमवेत वेळ घालवत आहेत. अशा परिस्थितीत आता हार्दिक आणि त्याच्या होणाऱ्या बायकोचा हा खास फोटो समोर आला आहे.