On This Day, July 25, 1983! 36 वर्षांपूर्वी कपिल देव च्या टीम इंडिया ने रचला इतिहास, जाणून घ्या विश्वकप विजेता बनण्याची कथा

विराट कोहली (Virat Kohli) चा भारतीय संघ यांचा विश्वकप जिंकण्यासाठी चा प्रबळ दावेदार मानला जात आहे. टीम इंडिया ने अजून आपला एकही सामना गमावला नाही आहे. मात्र, आजचा दिवस प्रत्त्येक भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी खास आहे. आज, 1983 मध्ये, 36 वर्षांपूर्वी, टीम इंडियाने कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्वाखाली भारतासाठी पहिले विश्वचषक जिंकून कोणी विचारही नव्हता केला असा इतिहास 25 जून 1983 साली घडला. (ICC World Cup : एक रेकॉर्ड असाही! कपिल देव यांच्या 1983 मधील या विक्रमाची ICC ने नोंदच केली नाही!)

त्या काळी, वेस्ट इंडिज (West Indies) क्रिकेटवर वर्चस्व गाजवत होता. त्यामुळे इतक्या बलाढ्य संघाला लॉर्ड्स (Lords) च्या मैदानात नमवून पहिल्यांदा विश्वकप जिंकणे हे कुठल्याही क्रिकेटपटू आणि क्रिकेट चाहत्यांसाठी स्वप्नांपेक्षा कमी नव्हते. त्या वेळी कोणी विचारही केला नव्हता की 1979 मध्ये ग्रुप स्टेजमध्ये बाहेर पडलेला संघ 1983 मध्ये विश्वचषकमध्ये दोनवेळा विजेता वेस्टइंडीजचा पराभव करत जगतजेता बनेल. कोट्यावधी भारतीयांसाठी तो सुवर्ण दिवस होता.

(Photo Credit: Getty Image)

1983 च्या संघात कोणताही तज्ञ फलंदाज किंवा गोलंदाज नव्हता, मात्र त्यांच्यात इतिहास लिहण्याची धमक होती. आज च्या या खास क्षणी आपण भारतीय संघाच्या अंतिम मोहिमे कडे पुन्हा बघू आणि कसे टीम इंडियाने विश्व जेता बेण्यासाठी वेस्ट इंडीजला नमवले.

फायनल चा प्रवास

1983 मध्ये भारत (India), ऑस्ट्रेलिया (Australia), झिम्बाब्वे (Zimbabwe) आणि वेस्ट इंडिज (West Indies) ब-गटात होते. या तुन वेस्ट इंडिज आणि टीम इंडिया ने उपांत्य फेरी गाठली. तेहवा भारत पहिल्यांदाच सेमीफायनलमध्ये पोहचला. त्यांचा सामना होता तो, यजमान इंग्लंड (England) विरुद्ध. मोहिंदर अमरनाथ (Mohinder Amarnath) यांनी गोलंदाजीमध्ये कमाल करत 27 धावा देत 2 विकेट घेतल्या होत्या तर, फलंदाजीमध्ये ही मॅच विनिंग 46 धावांची खेळी करत भारताला पहिल्यांदा फायनल मध्ये नेले.

 

View this post on Instagram

 

On This day 🗓️ That year ⏰⏰ India held the World Cup Trophy aloft at Lord's 🇮🇳🏆🏆

A post shared by Team India (@indiancricketteam) on

विश्वकप जेता

फायनल मध्ये वेस्ट इंडिजचे कर्णधार माईकल होल्डिंग (Michael Holding) टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला केवळ 183 धावा करता आल्या. यात अमरनाथ यांनी 80 चेंडूत 26 धावा केल्या. खतरनाक कॅरेबियन गोलंदाजीसमोर ते एकमेक तग धरुन उभे होते. अमरनाथ यांनी फलंदाजी सह गोलंदाजीमध्येही कमाल केली. 183 धावांचा पाठलाग करताना, इंडिज संघाने चांगली सुरुवात केली. जेफ डुज आणि मैक्लम मार्शल यांनी 43 धावांची भागीदारी केली. ज्यामुळे भारताच्या हातातून विश्वचषक निसटणार असे चित्र दिसत होते. तेवढ्यात अमरनाथ यांनी या दोन्ही फलंदाजांना बाद केले आणि भारताला पहिल्यांदा विश्व विजेता बनतात सहाय्य केले.