ICC World Cup : एक रेकॉर्ड असाही! कपिल देव यांच्या 1983 मधील या विक्रमाची ICC ने नोंदच केली नाही!
(Photo Credit: Getty Image)

भारताने 1983 मध्ये पहिला आयसीसी विश्वकप जिंकला आणि त्या दिवसापासून भारतात क्रिकेटची लोकप्रियता वाढत गेली. यंदाही किती लोकांना विचारले की 1983 मधील सर्वात संस्मरणीय क्षण कोणता तर लोकांचे उत्तर असते की तो दिवस जिव्हा भारताने विश्वकप जिंकला. पण ज्याने त्या वेळीच विश्वकप जवळून पहिला त्याच्यासाठी पहिला स्मरणात राहिलेला क्षण म्हणजे, माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) ची झिम्बाब्वे (Zimbabwe) विरुद्ध खेळलेली खेळी.  (ICC World Cup 2019 मध्ये Ind Vs Pak दरम्यान सचिन तेंडुलकर सोबत तुलना झालेल्या रोहित शर्माच्या Upper Cut वर सचिनचा खास रिप्लाय)

कपिल जेव्हा फलंदाजी करायला आले तेव्हा संघाच्या 5 बाद 17 धावा झाल्या होत्या. साखळी सामन्यात झिम्बॉम्बेविरुद्ध भारत (India) पराभवाच्या उंबरठ्यावर होता तेव्हा कपिल यांनी सगळी सूत्रे आपल्या हाती घेत तुफान फटकेबाजी करत 16 चौकार आणि 6 षटकाराच्या मदतीने 138 चेंडूत नाबाद 175 धावा केल्या. झिम्बाब्वेविरुद्ध हा सामना 18 जून 1983 ला इंग्लंडमधील टनब्रिल वेल्स (Turnbridge Wells) येथे खेळाला गेला होता. भारताने तो सामना जिंकला मात्र, कपिल यांची खेळी रेकॉर्ड होऊ शकली नाही. त्याचे कारण असे की, त्यादिवशी वेस्ट इंडिज (West indies)-ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातला सामना महत्त्वाचा वाटत असल्यानं सर्व कॅमेरे त्या सामन्याचे शूटिंग करण्यासाठी दिली होती.

दरम्यान, भारतीय संघाने, विराट कोहली (Virat Kohli) च्या नेतृत्वाखाली विश्वकपमध्ये चांगलं प्रदर्शन केल आहे. भारत 4 सामन्यात 3 विजयासह ICC गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. भारताचा न्यूझीलंड (New Zealand) विरुद्धचा सामान पावसामुळे रद्द केला गेला तर तिन्ही सामन्यात, दक्षिण आफ्रिका (South Africa), ऑस्ट्रेलिया (Australia) आणि पाकिस्तान (Pakistan) संघाना पराभूत केले आहे. भारताचा पुढचा सामना अफगाणिस्तान (Afghanistan) संघाशी 22 जूनला खेळाला जाईल.