रोहित शर्मा (Photo Credit: Getty Images)

Rohit Sharma's 3rd Double Hundred: भारतीय संघाचा स्फोटक सलामीवीर रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे, पण वनडेमध्ये दुहेरी शतकांच्या बाबतीत त्याच्या जवळपास कोणीही नाही. रोहितने अगदी तीन वर्षांपूर्वी आजच्या दिवशी श्रीलंकाविरुद्ध (Sri Lanka) असा पराक्रम केला ज्याच्या जवळ आजवर कोणताही फलंदाज पोहोचू शकलेला नाही. रोहितने केवळ चौकार व षटकारांच्या मदतीने 124 धावा करतआंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात विश्वविक्रमी तिसरे दुहेरी शतक झळकावले. रोहित क्रिकेटच्या छोट्या स्वरूपात आपल्या मोठ्या खेळीसाठी ओळखला जातो. टी-20 क्रिकेटमध्ये चार शतकं झळकावणाऱ्या रोहितने वनडेमध्ये तीन दुहेरी शतके केली आहेत. रोहित ही कामगिरी करणारा जगातील एकमेव फलंदाज आहे. 13 डिसेंबर 2007 रोजी रोहितने ऐतिहासिक आतिशी खेळी केली होती. 'हिटमॅन'ने मोहाली (Mohali) वनडेमध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या श्रीलंकेविरुद्ध 208 धावांची खेळी केली होती. (IND vs AUS Test 2020-21: रोहित शर्मा ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट संघात सामील होण्यासाठी सज्ज, क्वारंटाइननंतर सिडनी कसोटीत खेळण्यावर BCCI घेणार निर्णय)

या खेळीत त्याने 12 षटकार तर 13 चौकार खेचले होते. 153 चेंडूंचा सामना करणाऱ्या रोहितने केवळ चौकार व षटकारांच्या मदतीने 124 धावा केल्या होत्या. आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये पहिले दुहेरी शतक करण्याचा मान मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) मिळवला असला तरी तीन दुहेरी शतक करणारा रोहित आजवरचा एकमेव फलंदाज आहे. श्रीलंकाविरुद्ध या सामन्यात कर्णधार असताना रोहितने द्विशतक झळकावले होते. कर्णधार म्हणून दुहेरी शतक करणारा वीरेंद्र सेहवागनंतर रोहित दुसरा खेळाडू होता. सेहवागने इंदोरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 2011 मध्ये कर्णधार म्हणून 219 धावा केल्या होत्या. कर्णधार रोहितच्या नाबाद 208 धावांच्या जोरावर संघाने 392 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेला 251 धावांवर रोखलं आणि 141 धावांनी सामना जिंकला. रोहितने 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध बेंगलोर येथे पहिले दुहेरी शतक झळकावले होते.

लक्षात घेण्यासारखे म्हणजे रोहितने श्रीलंकाविरुद्ध दोन तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेमध्ये एक द्विशतकी खेळी केली आहे. विशेष म्हणजे, रोहितच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावांचीही नोंद आहे. रोहितने कोलकाताच्या इडन गार्डनवर श्रीलंकाविरुद्ध दुसरे द्विशतक झळकावत 264 धावांची खेळी केली होती. आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये आजवर सहा फलंदाजांनी द्विशतकी आकडा गाठला असून रोहित सचिन आणि वीरेंद्र सेहवागनंतर तिसरा फलंदाज आहे.