On This Day in 2009: सचिन तेंडुलकरने पार केला 30,000 आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा, श्रीलंकाविरुद्ध टेस्ट मॅचमध्ये नोंदवला विश्वविक्रम
सचिन तेंडुलकर (Photo Credits: Getty Images)

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने Sachin Tendulkar) भारतीय क्रिकेटमध्ये अनेक इतिहास रचले आहेत. यातील एक इतिहास, त्याने आजच्या दिवशी अहमदाबाद (Ahmedabad) येथे 11 वर्षांपूर्वी रचला होता. 2009 ध्ये सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 30,000 हजार आंतरराष्ट्रीय धावांचा विश्वविक्रम नोंदवला होता. भारत आणि श्रीलंका यांच्यात अहमदाबाद येथे झालेल्या तीन कसोटी सामन्यांपैकी पहिल्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी हा ऐतिहासिक क्षण आला. श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) खेळल्या जाणार्‍या कसोटी क्रिकेटमध्ये सचिनने हा विक्रम केला. यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन 30,000 धावा करणारा पहिला आणि आजवरचा एकमेव क्रिकेटपटू ठरला होता. कसोटी क्रिकेटच्या शेवटच्या दिवशी सचिनने चणका वेलेगेदाराच्या 44 ओव्हरमध्ये एक घेत सचिनने विश्वविक्रम आपल्या नावावर केला आणि 11 वर्षांनंतरही हा टप्पा पार करणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे. सचिननंतर श्रीलंकेच्या कुमार संगकाराने (Kumar Sangakkara) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 594 सामन्यात दुसऱ्या सर्वाधिक 28,016 धावा केल्या आहेत. (On This Day in 2013: सचिन तेंडुलकरने आजच्या दिवशी 200वा टेस्ट खेळून क्रिकेटल दिला भावुक निरोप, वानखेडे स्टेडियममध्ये झाला 'सचिन... सचिन...'चा जयघोष)

सचिनने श्रीलंकाविरुद्ध सामन्यात 88वे आंतरराष्ट्रीय आणि 43वे कसोटी शतक नोंदविले व व्हीव्हीस लक्ष्मण याच्याबरोबर पाचव्या विकेटसाठी 137 धावांची नाबाद भागीदारी केली. त्याने आपल्या डावात 11 चौकार ठोकले आणि मुथय्या मुरलीधरन व रंगना हेराथच्या फिरकी जोडीचा यशस्वी सामना केला. सामना बरोबरीत सुटला तर मास्टर-ब्लास्टरने 211 चेंडूत 100 धावा करून नाबाद परतला आणि क्रीजवर जवळजवळ 5 तास (298 मिनिटं) फलंदाजी केली. सचिनने 24 वर्षांची कारकीर्द 664 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 100 शतके आणि 164 अर्धशतकांसह 48.52 च्या सरासरीने 34,357 धावा करून संपुष्टात आणली. दरम्यान, सक्रिय फलंदाजांपैकी पुढील काही वर्षांत केवळ विराट कोहलीला मैलाचा दगड गाठण्याची संधी आहे. विराटने 416 सामन्यात एकूम 21,901 धावा केल्या आहेत.

निवृत्तीनंतर दिग्गज क्रिकेटपटू त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर सक्रिय दिसत आहे आणि टीम इंडियाच्या संस्मरणीय कामगिरीबद्दल त्याने अनेकदा अभिनंदन केले आहे. मास्टर-ब्लास्टर वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असून त्याने 49 वनडे आणि 51 कसोटी शतकं केली आहेत.