On This Day in 2007: युवराज सिंहला आठवला 13 वर्षांपूर्वीचा 6 षटकारांचा सामना, स्टुअर्ट ब्रॉडची प्रतिक्रिया जिंकेल तुमचेही मन
'सिक्सर किंग' युवराज सिंह (Photo Credits: Instagram)

क्रिकेटमध्ये 19 सप्टेंबर म्हणजे आजचा दिवस भारतीय क्रिकेटसाठी अविस्मरणीय आणि ऐतिहासिक दिवस मानला जातो. या दिवशी युवराजने असे काहीतरी केले होते, जे क्रिकेटच्या इतिहासात आज एक मोठी घटना म्हणून लक्षात ठेवली जाते. आजच्याच दिवशी 13 वर्षांपूर्वी 19 सप्टेंबर 2007 ला भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू यूवराज सिंहने (Yuvraj Singh) आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात 6 चेंडूत 6 षटकार मारत इतिहास घडवला होता. त्याने 2007 मध्ये झालेल्या पहिल्या आयसीसी टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) इंग्लंडविरुद्ध (England) सामन्यात हा पराक्रम केला होता. या रेकॉर्डची खास गोष्ट म्हणजे हे अद्याप त्याच्या नावावर नोंदलेले आहे. या सामन्यास 13 वर्षे पूर्ण झाल्यावर युवराजने एक पोस्ट शेअर केली आणि त्या घटनेला उजाळा दिला. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना युवराजने लिहिले की, "13 वर्षे... किती लवकर वेळ जात आहे." युवराजने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या (Stuart Broad) ओव्हरमध्ये हा पराक्रम केला होता ज्याची इंग्लिश गोलंदाजाला देखील विसर पडली नाही. (Most Expensive Player in IPL History: 'हा' आहे आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा प्लेअर, पाहा आयपीएल 2020 चे टॉप-5 करोडपती)

त्या सामन्यात सहा षटकार खाणाऱ्या ब्रॉडनेही युवीच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली ज्याने यूजर्सची मनं मात्र जिंकली. "त्या सामन्यात चेंडू ज्या प्रकारे उडत होता त्यापेक्षा वेळ वेगाने जात आहे" अशी टिप्पणी त्याने केली.

युवराजची पोस्ट

 

View this post on Instagram

 

13 years! How time flies!! #memories 🏏

A post shared by Yuvraj Singh (@yuvisofficial) on

ब्रॉडची प्रतिक्रिया...

(Photo Credits: Instagram)

या सामन्यात भारत प्रथम फलंदाजी करत होता. त्यावेळी 18व्या षटकात इंग्लंडच्या अँड्र्यू फ्लिंटॉफ आणि युवराजमध्ये शाब्दिक चकमक झाली. ज्यानंतर युवीने 19व्या षटकात 21-वर्षीय ब्रॉडच्या गोलंदाजीवर 6 चेंडूत 6 षटकार मारले. त्यावेळी तो हर्षल गिब्सनंतरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6 चेंडूत 6 षटकार मारणारा दुसरा फलंदाज ठरला होता. युवराजने ओव्हरमधील पहिल्या चेंडूवर मिडविकेटला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर स्क्वेअर लेगला षटकार मारला. तिसऱ्या चेंडूवर वाईड लॉन्ग ऑफवर युवराजने षटकार मारला. नंतर फुलटॉस आलेल्या चौथ्या चेंडूवरही युवराजने षटकार खेचला. यानंतर युवराजने पाचव्या चेंडूवर स्क्वेअर लेगला तर षटकातील शेवटच्या चेंडूवर वाईड लॉन्ग ऑनला षटकार मारला. याच बरोबर युवीने 21 चेंडूत आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये सर्वात जलद अर्धशतक करण्याचा कारनामा केला. युवराजचा हा विक्रम अद्याप कोणीही मोडू शकला नाही.