NZ vs WI 1st Test: यजमान न्यूझीलंड (New Zealand) आणि वेस्ट इंडीज (West Indies) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना हॅमिल्टनच्या (Hamilton) सिडन पार्क (Seddon Park) येथे खेळला गेला. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत खेळल्या जाणार्या या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्याचा निकाल चौथ्या दिवशी समोर आला. कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने वेस्ट इंडिजविरुद्ध जबरदस्त विजय मिळवून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. न्यूझीलंडने हॅमिल्टन कसोटीच्या चौथ्या दिवशी दुपारच्या जेवणापूर्वी विंडीजवर एक डाव आणि 134 धावांनी विक्रमी विजय मिळविला. 1999 मध्ये वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्ह (Basin Reserve) येथे डाव आणि 105 धावांनी विजयाला मागे टाकत किवी संघाने विंडीजविरुद्ध सर्वात मोठा विजय मिळविला. न्यूझीलंडने 519 धावांवर पहिला डाव घोषित केला. प्रत्युत्तरात विंडीज संघ पहिल्या डावात 138 आणि फॉलोऑन मिळाल्यावर दुसऱ्या डावात 247 धावाच करू शकला. (NZ vs WI 1st Test: केन विलियमसनचे तिसरे द्विशतक; स्टीफन फ्लेमिंग, ब्रेंडन मॅक्युलम यांच्या क्लबमध्ये सामील, वेस्ट इंडिजविरुद्ध न्यूझीलंडची आघाडी)
दरम्यान, विंडीजविरुद्ध आजच्या विजयाने न्यूझीलंडने घरच्या मैदानावर खेळत अजेय रेकॉर्ड कायम ठेवत 14वा कसोटी सामना जिंकला. वेस्ट इंडिजकडुन जर्मेन ब्लॅकवुडने शतकी खेळी केली. पहिले फलंदाजी करत न्यूझीलंडने 7 विकेट्सवर 519 धावांवर पहिला डाव घोषित केला. कर्णधार केन विल्यमसनने आपल्या कसोटी कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट डाव खेळला आणि 251 धावा केल्या. विल्यमसनला त्याच्या सर्वोत्कृष्ट दुहेरी शतकासाठी सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. चौथ्या दिवशी ब्लॅकवुड आणि अल्झारी जोसेफने हळूहळू डाव पुढे नेला. दरम्यान, जर्मेन ब्लॅकवुडने आपले शतक पूर्ण केले परंतु, त्यास मोठ्या खेळीत रूपांतर करता आले नाही. त्याने 141 चेंडूंत 11 चौकार आणि 2 षटकारांसह 104 धावा केल्या. याशिवाय अल्झारी जोसेफनेही 86 धावांची शानदार खेळी केली. दोघांमध्ये सातव्या विकेटसाठी 155 धावांची भागीदारी झाली. याशिवाय वेस्ट इंडीजचा कोणताही फलंदाज मोठा डाव खेळू शकला नाही तर अंतिम 3 खेळाडू भोपळाही फोडू शकले नाही. नील वॅग्नेरने न्यूझीलंडकडून दुसर्या डावात 4 विकेट घेत शानदार कामगिरी केली.
WAGNER AND JAMIESON SEAL BIG VICTORY FOR 🇳🇿
New Zealand pacers shine to help their side win by an innings and 134 runs, their biggest in terms of runs against West Indies 🙌#NZvWI | Report 👇
— ICC (@ICC) December 6, 2020
11 डिसेंबरपासून बेसिन रिझर्व येथे दुसरा कसोटी सामना खेळला जाईल.