NZ vs WI 1st Test: केन विलियमसनचे तिसरे द्विशतक; स्टीफन फ्लेमिंग, ब्रेंडन मॅक्युलम यांच्या क्लबमध्ये सामील, वेस्ट इंडिजविरुद्ध न्यूझीलंडची आघाडी
केन विल्यमसन (Photo Credit: PTI)

NZ vs WI 1st Test: न्यूझीलंड (New Zealand) आणि वेस्ट इंडीज (West Indies) यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात असून मालिकेचा पहिला सामना हॅमिल्टनमध्ये (Hamilton) खेळला जात आहे. सामन्याच्या दुसर्‍या दिवशी किवीचा कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) कसोटी कारकिर्दीतील तिसरे द्विशतक करत 251 धावांवर बाद झाला. कसोटी क्रिकेटमध्ये विल्यम्सनपूर्वी न्यूझीलंडच्या तीनच फलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये तीन किंवा अधिक दुहेरी शतके ठोकली होती आणि या तीनही फलंदाजांमधील एक सामान्य गोष्ट म्हणजे तिघांनी संघाचे नेतृत्व केले आहेत. न्यूझीलंडसाठी कसोटी क्रिकेटमध्ये स्टीफन फ्लेमिंग Stephen Fleming), ब्रेंडन मॅक्युलम (Brandon McCullum) आणि रॉस टेलर (Ross Taylor) यांनी दोनहून अधिक दुहेरी शतकं केली आहेत. मॅक्युलमने सर्वाधिक 4 तर फ्लेमिंग आणि टेलरने प्रेत्येकी 3 द्विशतक केले आहेत. पहिल्या दिवशी विल्यम्सन 97 धावांवर नाबाद परतला आणि सामन्याच्या दुसर्‍या दिवशी त्याने 224 चेंडूत 22वे शतक पूर्ण केले. यानंतर 369 चेंडूत 200 धावा पूर्ण केल्या, विल्यम्सनने आपल्या खेळी 34 चौकार आणि 2 षटकार लगावले. (New Zealand दौऱ्यावर Pakistan संघाला कोरोना प्रोटोकॉल तोडणं पडलं महागात, पाकिस्तान टीमचा आठवा सदस्य COVID-19 पॉसिटीव्ह)

विल्यमसनने चार मोठ्या भागीदारी महत्वाची भूमिका बजावली. टॉम लॅथमसह दुसऱ्या विकेटसाठी 154, रॉस टेलरसोबत तिसऱ्या विकेटसाठी 83, पाचव्या विकेटसाठी टॉम ब्लंडेलबरोबर 72 आणि सातव्या विकेटसाठी काइल जेमिसनसोबत 94 धावा अशा भागीदारीत विल्यम्सनचा समावेश होता. विल्यम्सननंतर काइल जेमीसनने 62 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले, ज्यात पाच चौकार व दोन षटकारांचा समावेश होता. टीम साऊदी 11 धावांवर नाबाद परतला आणि न्यूझीलंडने सात विकेट गमावून 519 धावांवर डाव घोषित केला होता आणि दुसर्‍या दिवसाचा खेळ संपेपर्यंत वेस्ट इंडीजने विकेट न गमावता 49 धावा केल्या आहेत. वेस्ट इंडिजकडून क्रेग ब्रेथवेट नाबाद 20 आणि जॉन कॅम्पबेल नाबाद 22 धावा करून खेळत आहे.

विल्यम्सनचे दुहेरी शतक आणि अन्य खेळाडूंच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंड मजबूत स्थितीत पोहचले आहे. कीवी टीमकडून अद्याप टिम साऊदी, ट्रेंट बोल्ट, काइल जेमिसन आणि नील वैगिनर यांनी गोलंदाजी केली आहेत, परंतु त्यापैकी एकालाही अद्याप विकेट मिळाली नाही.