बीजे वाटलिंग (BJ Watling) याने इंग्लंड (England) विरुद्ध सुरु असलेल्या कसोटी सामन्यात दुहेरी शतक झळकावले आणि एक विश्वविक्रमची नोंद केली. इंग्लंड विरुद्ध बे ओव्हल (Bay Oval( मैदानात सुरु असलेल्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी त्याने हे कामगिरी केली. वाटलिंगने 24 चौकार आणि एक षटकारसह 205 धावा केल्या आणि बाद झाला. सलग दोन कसोटी शतक ठोकणारा तो न्यूझीलंडचा (New Zealand) पहिला विकेटकीपर फलंदाज आहे. शिवाय, घरच्या मैदानावर खेळताना दुहेरी शतक ठोकणारा पहिला विकेटकीपर आहे. इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत वाटलिंगच्या या कामगिरीमुळे यजमान न्यूझीलंड मजबूत स्थितीत पोहोचला आहे. इंग्लंडविरुद्ध कोणत्याही विकेटकीपर फलंदाजाचे हे पहिले दुहेरी शतक आहे. बे ओव्हलमध्ये सुरु असेल्या या कामगिरीसह वाटलिंगने माजी भारतीय विकेटकीपर-फलंदाजांचा 54 वर्ष जुना विक्रमही मोडीत काढला आहे.
भारताच्या बुधी कुंदेरान (Budhi Kunderan) यांनी विकेटकीपर म्हणून इंग्लंड विरुद्ध सर्वात मोठा डाव खेळला. त्याने 1963-64 मध्ये चेन्नईत इंग्लंडविरुद्ध 192 धावांची खेळी केली होती. यासह, वाटलिंगने इंग्लंडविरुद्ध कसोटीतील टीम इंडियाचाय या यष्टीरक्षक फलंदाजाच्या महान खेळीचा 54 वर्षांचा विक्रम मोडला. वाटलिंगपूर्वी किवीचा माजी कर्णधार ब्रँडन मॅक्युलम याने सर्वात मोठा डाव खेळला होता. त्याने 2010 मध्ये बांगलादेशविरुद्ध 185 धावा केल्या होत्या. महेंद्र सिंह धोनी याने विकेटकीपर म्हणून भारताकडून 2013 च्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नई कसोटीत त्याने 224 धावांचा सर्वात मोठा डाव खेळला होता.
दरम्यान, इंग्लंडच्या पहिल्या डावाच्या एकूण 353 धावांच्या उत्तरात न्यूझीलंडने 9 बाद 615 धावांवर पहिला डाव घोषित केला. इंग्लंडविरुद्ध कसोटीत किवी संघाची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. फिरकीपटू मिचेल सेंटनर याच्यासह वाटलिंगने 7 व्या विकेटसाठी 261 धावांची भागीदारी करत न्यूझीलंडला पहिल्या डावाच्या प्रत्युत्तरात मोठी आघाडी मिळवून दिली. सॅनटनरनेही आपल्या कारकिर्दीतील पहिले कसोटी शतक झळकावत 126 धावा केल्या.