टीम इंडिया खेळाडूंचा वेतनात होणार कपात? BCCI कोषाध्यक्ष अरुण धूमल यांनी केला खुलासा
भारतीय क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/ICC)

जगभर पसरलेल्या प्राणघातक कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव झाल्यापासून जगभरातील खेळाडूंना वेतन कपात करण्यास सांगितले जात आहे. प्रमुख फुटबॉल क्लबजपासून अनेक क्रिकेटींग देशांनी वेतन कपातीचा निर्णय घेतला आहे. परंतु जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या उलट निर्णय घेतला आहे. या प्राणघातक व्हायरसच्या काळात त्यांनी खेळाडूंचा पगार कमी करण्याचा विचार करीत नाहीत आणि त्यांच्या मनातही नसल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केले. भारतीय क्रिकेटपटूंच्या पगाराचा (Indian Cricketers Salary) विचार करता सध्या असा कोणताही विचार केला जात नसल्याचे बीसीसीआयचे खजिनदार अरुण धूमल यांनी स्पष्ट केले. उच्च व्यवस्थापनांमध्ये या विषयावर आजवर अशी चर्चा झालेली नाही, असे धुमल यांनी स्पष्ट केले. कोरोना व्हायरसचा प्रसार जगभर झाल्यामुळे सर्व काही ठप्प झाले आहे आणि अशा स्थितीत खेळाडूंचा पगार कमी करण्याच्या चर्चा सध्या सुरु आहे. लिओनेल मेस्सी आणि बार्सिलोना (Barcelona) फुटबॉल क्लबच्या खेळाडूंनी स्वतःहून यापूर्वी 70 टक्के पगार दान करण्याचे जाहीर केले होते. (Coronavirus: विराट कोहलीसह टीम इंडियाच्या वेतनात कपातीची शक्यता, कमाई कमी झाल्यास BCCI उचलू शकते पाऊल)

“नाही, आम्ही याबद्दल बोललो नाही (पे कट).या धक्क्यानंतर जे काही पाऊलं उचलली गेली तरी ते न्याय्यपणे आणि सर्वांचे हित लक्षात घेऊन घेतले जाईल. कोणत्याही पावलाबद्दल विचार करणे आवश्यक आहे आणि आत्ता आम्ही याबद्दल विचार केलेला नाही. अर्थात हा एक मोठा धक्का आहे, परंतु याचा परिणाम असा होईल की कोणावरही परिणाम होणार नाही. एकदा गोष्टी स्थिर झाल्या की या गोष्टींवर चर्चा होऊ शकते, 'असे धूमल यांनी आयएएनएसद्वारे सांगितले. बीसीसीआयच्या एका सूत्राने असेही म्हटले आहे की, कोविड-19मुळे (COVID-19) पुढे ढकलण्यात आलेली इंडिया प्रीमियर लीग (आयपीएल) वर निर्णय परिस्थितीत सुधारणा होईल तेव्हाच घेण्यात येईल.

यावेळी, खेळाडूंच्या पगारात कपात केल्या जाण्याच्या बातम्या सामान्य आहेत. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मते, भारतात कोविड-19 सकारात्मक रुग्णांची संख्या 1,637 पर्यंत वाढली असून यामध्ये 1466 सक्रिय आहेत. यातील 133 बरे/विमुक्त/स्थलांतरित लोक आणि 38 जणांचा मृत्यू झाला आहे.