Coronavirus: विराट कोहलीसह टीम इंडियाच्या वेतनात कपातीची शक्यता, कमाई कमी झाल्यास BCCI उचलू शकते पाऊल
भारतीय क्रिकेट टीम (Photo Credit: Getty Images)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirsu) आजारामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा बीसीसीआयला (BCCI) मोठा फटका बसण्याची शक्यता आहे ज्यामुळे यंदा भारतीय क्रिकेटपटूंच्या (Indian Cricketers) वेतन कपातची अपेक्षा केली जात आहे. भारतीय खेळाडूंमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह हे तीन सर्वाधिक कमाई करणारे खेळाडू आहेत. हे तिघे बीसीसीआयकडून वार्षिक 7 कोटींची कमाई करतात. या घातक महामारीमुळे जभरातील सर्व क्रीडा स्पर्धा रद्द किंवा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशा स्थितीत संभाव्य उत्पन्नातील तोटा भागधारकांना बसणार आहे. बॉलिसोना (Barcelona) आणि जुव्हेंटस (Juventus) यासारख्या बर्‍याच बड्या युरोपियन क्लबांनी आपल्या वेतन कपातची घोषणा केली आहे. लिओनेल मेस्सीने (Lionel Messi) मंगळवारी याची पुष्टी केली की बार्का फुटबॉलर्सने 70 टक्के वेतन कपात करण्यास सहमती दर्शविली आहे तर क्रिस्टियानो रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) जुव्हेंटसला आर्थिक संकटावर विजय मिळवण्यासाठी चार महिन्यांचा पगार न घेण्याचे समोर येत आहे. शिवाय, इंग्लंड क्रिकेट बोर्डदेखील खेळाडूंच्या वेतनात कपात करू शकते. (कोरोना व्हायरसमुळे कापला जाणार इंग्लंड क्रिकेटपटूंचा पगार; जो रूट, बेन स्टोक्ससह अन्य खेळाडूंच्या वेतनात होणार कोटींची कपात)

इंडियन क्रिकेटर्स असोसिएशनचे (आयसीए) अध्यक्ष अशोक मल्होत्रा यांनी पुष्टी केली की वेतन कपात करणे अन्यायकारक आहे, पण जर बीसीसीआय पूर्वीपेक्षा जास्त पैसे कमवत नसेल तर हे असे पाऊल उचलण्याची शक्यता आहे. “बीसीसीआय ही क्रिकेटर्सची मूळ संस्था आहे,” मल्होत्रा यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले. “ही एक कंपनी आहे. जर एखादी कंपनी नुकसानात जात आहे असेल तर सर्व फिल्टर्स खाली येतात. युरोपमध्ये जवळजवळ सर्व फुटबॉलर्स, सामान्यत: सर्वांपेक्षा जास्त पैसे देतात, त्यांच्या वेतनात मोठी कपात केली जात असून, त्यांच्या संघटनांनी जाहीर केली आहे. ही एक अनपेक्षित परिस्थिती होती.” ते पुढे म्हणाले, “हा अतिशय कठीण काळ आहे. म्हणून, प्रत्येकास त्यांच्या खिशातून त्यांचे योगदान द्यावे लागेल. मला माहित आहे की खेळाडूंचे पगार कमी करणे योग्य नाही, परंतु जर संस्था पूर्वी करत असलेली कमाई करत नसेल तर क्रिकेटपटूंना पगारात कपातची अपेक्षा करावी लागेल.”

सध्या भारतात 21 दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला असून संक्रमिताची संख्या 1,400 च्या जवळ पोहचली आहे, तर 35 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.