IND Vs ENG ODI Series 2021: जसप्रीस बुमराह याने दुखापतीमुळे नव्हेतर, 'या' कारणामुळे एकदिवसीय मालिकेतून घेतली माघार
जसप्रीत बुमराह (Photo Credits: Getty Images)

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीस बुमराहने (Jasprit Bumrah) इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यातून माघार घेतली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला 12 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत जसप्रीस बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. मात्र, त्यानंतर खेळले जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेतही (IND Vs ENG ODI Series 2021) जसप्रीस बुमराह खेळणार नसल्याची माहिती समोर आली आहे. जसप्रीत बुमराह लवकरच लग्न बंधणात अडकणार आहे. यासाठीच त्याने रजा घेतली, अशीही माहिती मिळत आहे.

एएनआयच्या एका वृत्तानुसार, जसप्रीत बुमराह लवकरच लग्न बंधणात अडकणार आहे. या खास दिवसाच्या तयारीसाठी आपल्या कुटुंबाला आधार देता यावा म्हणून त्याने रजा घेतली आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे. हे देखील वाचा- ICC Player of the Month: 'प्लेयर ऑफ द मंथ' पुरस्कारासाठी रविचंद्रन अश्विन, जो रुट, कायल मायर्स यांच्यात रंगला सामना

एएनआयचे ट्वीट-

इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत जसप्रीत बुमराहची जागी कोणत्या खेळाडूला संधी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच टी.नटराजन, शार्दुल ठाकूर, दिपक चाहर आणि नवदीप सैनी यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, बीसीसीआय यापैकी कोणत्या खेळाडूची निवड करेल? हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे.