ICC Player of the Month: 'प्लेयर ऑफ द मंथ' पुरस्कारासाठी रविचंद्रन अश्विन, जो रुट, कायल मायर्स यांच्यात रंगला सामना
मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड (Photo Credits: Twitter|@ICC)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने नवीन वर्षाच्या निमित्ताने आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ (ICC Player of the Month) पुरस्कार घोषणा केली होती. त्यानुसार महिन्याभरात चांगली कामगिरी करणाऱ्या एका पुरुष आणि महिला खेळाडूचा सन्मान करण्यात येणार आहे. तथापि, यासाठी नामांकन व त्यानंतर मतदानाची फेरी होती, त्यानंतर आयसीसीचा महिन्याचा प्लेअर कोण आहे? हे निश्चित केले जाते. जानेवारीनंतर फेब्रुवारी महिन्याच्या प्लेअर ऑफ द महिन्यासाठी नामांकनांची यादी जाहीर करण्यात आली असून त्यामध्ये एका भारतीय खेळाडूचा समावेश आहे.

आयसीसीने फेब्रुवारी महिन्यासाठी नामांकन यादीसाठी पुरुष संघात तीन खेळाडूंचा समावेश केला असून त्यामध्ये इंग्लंडचा कर्णधार जो रुट, भारतीय फिरकी गोलंदाज आर अश्विन आणि वेस्ट इंडीजच्या काइल मायर्सचा समावेश आहे. सलग दुसर्‍यांदाच नामांकनांच्या यादीत जो रूट याचा समावेश आहे. जानेवारी महिन्यात शेवटच्या वेळी जो रूटला नामांकन मिळाले होते. परंतु, रिषभ पंतने हा पुरस्कार त्यांच्या नावावर केला. मात्र, यंदाही जो रुटला आर अश्विनकडून जोरदार टक्कर मिळत आहे. तर काइल मायर्स चांगले प्रदर्शन करून सर्वांची मन जिंकली आहेत. हे देखील वाचा- सेहवागला शतकापासून रोखण्यासाठी नो बॉल टाकलेला श्रीलंकेच्या 'हा' ऑफस्पिनर आता बनला आहे बस चा ड्राइव्हर

चेन्नई येथे खेळल्या गेल्या तीन कसोटी सामन्यात अश्विनने इंग्लडविरुद्ध चांगली कामगिरी करून दाखवली होती. अश्विनने दुसऱ्या कसोटी सामन्यात 106 धावा केल्या होत्या. तर, तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 400 विकेट घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर केला आहे.

त्यानंतर जो रुटने भारत विरुद्ध सुरु असलेल्या कसोटी सामन्यात 333 धावा तर, 6 विकेट्स घेतले आहेत. गेल्या महिन्यातही जो रुटने नामांकनाच्या यादीत स्थान मिळवले होते. त्यावेळी त्याने भारताविरुद्ध 218 धावा ठोकल्या होत्या.

याशिवाय, वेस्टइंडीजच्या संघासाठी पदार्पण करणारा काइल मायर्सने सर्वोकृष्ट खेळी केली आहे. त्याने 218 धावा केल्या. ज्यामुळे वेस्टइंडीजच्या संघाला 395 लक्ष्य पूर्ण करता आले आहे.

आयसीसीने जारी केलेल्या प्रसिद्धीनुसार, एकूण 176 धावा आणि 24 विकेट्स घेणारा अश्विन पुरुष गटात फेब्रुवारी महिन्यात नामांकन मिळवण्याचा हक्कदार आहे.