निकोलस पूरन (Photo Credit: Getty Images)

West Indies Cricket Team vs South Africa National Cricket Team: निकोलस पूरनच्या स्फोटक खेळीच्या बळावर (26 चेंडूत नाबाद 65) वेस्ट इंडिजने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव केला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेकडून ट्रिस्टन स्टब्स (42 चेंडूत 76 धावा) आणि पॅट्रिक क्रुगरच्या 44 धावा (32 चेंडू) यांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजला 175 धावांचे लक्ष्य दिले.

लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची स्फोटक सुरुवात

त्यानंतर 175 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या वेस्ट इंडिज संघाला अलिक अथंजे आणि शे होप यांनी स्फोटक सुरुवात करून दिली. दोन्ही फलंदाजांमध्ये आठ षटकांत 84 धावांची भागीदारी झाली. 30 चेंडूंत 40 धावांची (दोन चौकार, तीन षटकार) खेळी केल्यानंतर अलिक अथंजे बाद झाला. शे होपने टी-20 आंतरराष्ट्रीय मधील चौथे अर्धशतक झळकावले आणि 36 चेंडूत 51 धावा (दोन चौकार, तीन षटकार) करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

निकोलस पूरनची धमाकेदार खेळी

निकोलस पूरनच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजने अवघ्या 17.5 षटकांत सामना जिंकला. पुरणने आपल्या खेळीत दोन चौकार आणि सात षटकार मारले. रोव्हमन पावेलने सात, तर रोव्हमन पावेलने चार नाबाद धावा केल्या.