Photo Credit- X

Nepal Women's National Cricket vs Thailand Women's National Cricket Team 6th T20 2025 Live Streaming: नेपाळ महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि थायलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ (NEP W vs THAI W 6th T20 2025) यांच्यातील टी20 तिरंगी मालिकेतील सहावा टी20 सामना आज म्हणजेच 4 फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कीर्तिपूर येथील त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळला जाईल. नेपाळने तिरंगी मालिकेत आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांना तिन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. नेपाळ संघ पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.

दुसरीकडे, थायलंडने आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत आणि ते तिन्ही जिंकले आहेत. थायलंडचा संघ पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे. दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक सामना पाहायला मिळतो. तथापि, नेपाळसाठी हा सामना जिंकणे महत्त्वाचे आहे. (IND vs ENG 2025, Vidarbha Cricket Stadium Pitch Stats & Records: विदर्भ क्रिकेट स्टेडियममध्ये भारत-इंग्लंड आमनेसामने; एकदिवसीय सामन्यापूर्वी खेळपट्टी, हेड टू हेड रेकॉर्ड आणि सर्व माहिती घ्या जाणून)

नेपाळ महिला आणि थायलंड महिला संघांमधील सहावा टी-20 सामना कधी खेळला जाईल?

नेपाळ महिला आणि थायलंड महिला यांच्यातील सहावा टी-20 सामना मंगळवारी 4 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कीर्तिपूर येथे खेळला जाईल.

नेपाळ महिला आणि थायलंड महिला यांच्यातील सहावा टी-20 सामना कुठे पहाता येईल?

भारतातील कोणत्याही टीव्हीवर नेपाळ महिला आणि थायलंड महिला यांच्यातील टी-20 मालिकेचे थेट प्रक्षेपण होण्याची माहिती नाही. मात्र, क्रीकेट चाहते सामना लाईव्ह स्ट्रीमिंग फॅनकोड अॅप आणि वेबसाइटवर पाहू शकतात.

दोन्ही संघांचे खेळाडू

थायलंड महिला संघ: नट्टाया बूचाथम, अपिसरा सुवानचोनरथ, नन्नापत कोंचारोएनकाई (विकेटकीपर), नरुएमोल चाईवाई (कर्णधार), फनिता माया, चानिदा सुथिरुआंग, सुवानन खियाओतो, थिपचा पुथावोंग, ओनिचा कामचोम्फू, सुनीदा चतुरोनग्राताना, सुलीपोर्न लाओमी, नट्टाकन चांटम, रोसेनन कानोह, नन्नापत. चौहान

नेपाळ महिला संघ: समझना खडका, ममता चौधरी, इंदू बर्मा (कर्णधार), पूजा महातो, रुबिना छेत्री, कविता कुंवर, बिंदू रावल, कविता जोशी, सीता राणा मगर, अलिशा यादव (विकेटकीपर), मनीषा उपाध्याय, ईश्वरी बिस्ट, रोमा थापा, राजमती एरी