क्रिकेटपटू विराट कोहलीला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2018 प्रदान
विराट कोहली (Photo Credits: Twitter)

नवी दिल्ली : खेळ क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारांचं आज वितरण करण्यात आलं आले. क्रिकेटपटू विराट कोहली आणि वेट लिफ्टर मीराबाई चानू या दोन खेळाडूंचा यंदा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2018 देऊन गौरव करण्यात आला.    राष्ट्रपती भवनामध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला.

विराट कोहलीच्या शिरपेचात मानाचा तुरा 

क्रिकेटर विराट कोहलीला यंदाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2018 देण्यात आला. हा खेळविश्वातील सर्वोच्च पुरस्कार स्वीकारणारा विराट कोहली हा तिसरा क्रिकेटर ठरला आहे. विराटपूर्वी सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी या क्रिकेटर्सचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.

 

आयसीसीच्या रॅकिंगमध्ये विराट कोहली अव्वल स्थानी आहे. सध्या एशिया कप 2018 च्या सामन्यांमध्ये विराट खेळत नसल्याने त्याचे चाहते हिरमुसले आहेत. मात्र भारतीय संघामध्ये 'रनमशीन' अशी ओळख असणारा विराट राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने गौरवला गेल्याने त्याच्या विराट सोबतच त्याच्या चाहत्यांसाठी हा अभिमानास्पद क्षण आहे.