MI vs DC (Photo Credit - X)

DC vs MI, TATA IPL 2025 29th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 29 वा सामना आज म्हणजेच 13 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (DC vs MI) यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जात आहे. या हंगामात, दिल्लीचे नेतृत्व अक्षर पटेल करत आहे. तर, मुंबईची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर आहे. या हंगामात दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी स्फोटक राहिली आहे. दिल्ली कॅपिटल्सने या हंगामात अद्याप एकही सामना गमावलेला नाही. तर, मुंबई इंडियन्स संघाने पाच सामने खेळून फक्त एकच सामना जिंकला आहे. दरम्यान, या रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या मुंबईने दिल्लीसमोर 206 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

तिलक वर्माची 59 धावांची दमदार खेळी

प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने निर्धारित 20 षटकांत पाच गडी गमावून 205 धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून तिलक वर्माने सर्वाधिक 59 धावा केल्या. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, तिलक वर्माने 33 चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकार मारले. तिलक वर्मा व्यतिरिक्त, सलामीवीर रायन रिकेल्टनने 41 धावा केल्या.

कुलदीप यादवने घेतल्या दोन विकेट

दुसरीकडे, स्टार युवा गोलंदाज विप्राज निगमने दिल्ली कॅपिटल्स संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. दिल्ली कॅपिटल्सकडून विप्रराज निगम आणि कुलदीप यादव यांनी सर्वाधिक विकेट्स घेतल्या. विप्राज निगम आणि कुलदीप यादव यांच्याव्यतिरिक्त मुकेश कुमारने एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाला 20 षटकांत 206 धावा कराव्या लागतील. दोन्ही संघांना हा सामना जिंकून त्यांच्या खात्यात दोन गुण मिळवायचे आहेत.