IPL 2021: ‘सिनियर भारतीय खेळाडूंना बायो बबलमध्ये बंधन आवडत नव्हते’, मुंबई इंडियन्सच्या विदेशी प्रशिक्षकाने केला खुलासा
मुंबई इंडियन्स (Photo Credit: PTI)

IPL 2021: भारतात कोरोना व्हायरसच्या घातक दुसऱ्या लाटेमुळे इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. यांनतर फ्रँचायझींनी बीसीसीआय सोबत काम करत सर्व परदेशी खेळाडूंची त्यांच्या मायदेशी रवानगी केली. यादरम्यान मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) फिल्डिंग प्रशिक्षक जेम्स पामेंट (James Pamment) यांनी आयपीएल (IPL) 2021 च्या काळात कशी परिस्थिती होती याचा खुलासा केला आहे. मुंबई इंडियन्सचे फील्डिंग कोच जेम्स पमेंट म्हणाले की, संघाशी संबंधित काही ज्येष्ठ भारतीय खेळाडूंना बंधनं आवडत नव्हती. त्यांना इतक्या मर्यादा पसंत नसल्याचा त्यांनी दावा केला आहे. मात्र भारताबाहेर भीषण परिस्थिती असताना मुंबई इंडियन्सचे खेळाडू बायो सिक्युर बबलमध्ये सुरक्षित असल्याचं त्यांनी म्हटलं. (IPL 2021 Suspended: आयपीएल 14 चे उर्वरित सामने झाल्यास हे खेळाडू होणार ‘आऊट’, बोर्डाने केले मोठे विधान)

मुंबईचे खेळाडू ट्रेंट बोल्ट, मॅट हेन्री, जेम्स नीशम आणि गोलंदाजी प्रशिक्षक शेन बाँडसमवेत पामेंट ऑकलंडला रवाना झाले होते. पामेंट यांनी stuff.co.nz ला दिलेल्या मुलाखतीत पुढे म्हटले की, “भारतात एखाद्याने आपले प्रियजन गमावले होते आणि ज्यांना असे वाटत होते की आम्ही आयपीएल चालू ठेऊ इच्छितो अशांकडून आम्ही शिकत होतो. आम्ही भाग्यवान होते जे व्यावसायिक पद्धतीने त्यांना सेवा देत होतो.” माजी किवी खेळाडूने असेही म्हटले की, भारतीय खेळाडूंपैकी काही जणांचे कुटुंबीय आजारी होते पण त्यांनी आपले काम सुरूच ठेवले.

पामेंट म्हणाले की, चेन्नईला गेल्यानंतर जेव्हा संघाच्या सहाय्यक कर्मचार्‍याची कोविड-19 टेस्ट सकारात्मक आली तेव्हा त्यांना समजले की बबल अभेद्य नाही. “आम्हाला वाटले की प्रवास करणे नेहमीच एक आव्हान असेल. आम्ही स्पर्धेच्या सुरूवातीच्या तयारीसाठी चेन्नईला गेलो होतो तेव्हा आमच्या पहिल्या प्रवासादरम्यान प्रकरण आले होते आणि त्याच्याशी जवळचे संपर्क मानले गेलेल्या कोणालाही संसर्ग झाला नाही. परंतु आपला बबल अभेद्य नाही हे सुरुवातीलाच कळले होते. आम्ही कसे ऑपरेट केले याबद्दल कदाचित आम्हाला आणखी कठोर झालो,” ते पुढे म्हणाले. दरम्यान, मुंबई इंडियन्सच्या मोहिमेबद्दल सांगायचे तर, गतविजेत्या चॅम्पियन्सना आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) विरुद्ध पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.