Mumbai Indians IPL 2021 Squad: मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) गुरुवारी इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 2021 खेळाडूंच्या लिलावादरम्यान संघात काही दर्जेदार खेळाडूंची भर घातली आहे. टूर्नामेंटमधील सर्वात मजबूत संघांपैकी एक असल्याने मुंबईने जास्त काही बदल न करण्याच्या इराद्याने लिलावात प्रवेश केला. पाच वेळा आयपीएल (IPL) विजेतेपदाच्या मान मिळणारी मुंबई इंडियन्स काही चांगल्या वेगवान गोलंदाजांच्या शोधात होता आणि ते सध्या करण्यात ते नक्कीच यशस्वी झाले. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज अॅडम मिल्नेला (Adam Milne) मुंबईने पुन्हा एकदा 5 कोटी रुपयात खरेदी केले, त्यानंतर नॅथन कोल्टर-नाईलचा (Nathan Coulter-Nile) संघात समावेश केला जे ऑस्ट्रेलियन जेम्स पॅटिन्सनची बदली म्हणून मैदानात ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराहला वेगवान गोलंदाजी विभागात साथ देतील. मुंबई इंडियन्सनेही अनुभवी भारतीय फिरकीपटू पीयूष चावलाला 2.4 कोटी रुपयांत खरेदी करत गोलंदाजी विभाग आणखी मजबूत केला. (IPL 2021 Auction: आयपीएलसाठी 8 संघानी खेळाडूंवर केली पैशाची बरसात, पहा MI, CSK, PBKS सह सर्व संघाची संपूर्ण यादी)
लिलावापूर्वी चेन्नई सुपर किंग्जने रिलीज केलेल्या चावला पुन्हा एकदा लिलावात खरेदीदार शोधण्यात यशस्वी झाला. आयपीएलमध्ये 164 सामन्यात 156 विकेट्ससह तो आतापर्यंतचा सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा गोलंदाज आहे. मुंबई इंडियन्सने कीरोन पोलार्डचा उत्कृष्ट बॅकअप म्हणूनन्यूझीलंडचा अष्टपैलू जेम्स नीशमलाही संघात स्थान दिले आहे. लिलावात मुंबई इंडियन्सने युवा अर्जुन तेंडुलकरला 20 लाख रुपयांच्या बेस किंमतीवर अंतिम खेळाडूची खरेदी केली. दिग्गज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला मुंबई इंडियन्समध्ये वडिलांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळणार आहे.
आयपीएल 2021 साठी मुंबई इंडियन्सची पूर्ण संघ: रोहित शर्मा, आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंह, अनुकुल रॉय, धवल कुलकर्णी, हार्दिक पांड्या, ईशान किशन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, किरोन पोलार्ड, क्रुणाल पांड्या, क्विंटन डी कॉक, राहुल चाहर, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट, क्रिस लिन, सौरभ तिवारी, मोहसीन खान, अॅडम मिल्ने, नॅथन कोल्टर-नाईल, पियुष चावला, जेम्स नीशम, युधवीर सिंह, मार्को जेन्सेन आणि अर्जुन तेंडुलकर.