Mumbai Indians IPL 2021 Schedule: यूएई येथे मुंबई इंडियन्सच्या ‘पलटन’चा कधी, कोणाबरोबर होणार सामना; पाहा संपूर्ण वेळापत्रक
मुंबई इंडियन्स (Photo Credit: PTI)

Mumbai Indians IPL 2021 Schedule: युएई (UAE) येथे होणाऱ्या आयपीएलच्या (IPL) 14 व्या हंगामातील उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहेत. चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि गतविजेत्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यातील ब्लॉकबस्टर सामन्याने इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या रणसंग्रामाला सुरुवात होणार आहे. दुसर्‍या टप्प्यात 27 दिवसांच्या कालावधीत एकूण 31 सामने खेळले जातील. दुबईमध्ये एकूण 13 सामने, शारजाहमध्ये 10 आणि अबू धाबी येथे 8 सामने होणार आहेत. गतविजेते मुंबई इंडियन्स सध्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर असून युएई त्यांच्यासाठी पुन्हा एकदा विजेतेपदाचा मान मिळवण्यासाठी एक उपयुक्त ठिकाण ठरू शकते. (IPL 2021: युएईमध्ये आयपीएलच्या उर्वरित सामन्यांची BCCI ने केली घोषणा, जाणून घ्या नवीन वेळापत्रक)

रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सच्या ‘पलटन’चे युएई येथील सामन्यांचे ठिकाण आणि सामन्यांच्या वेळेची संपूर्ण वेळापत्रक इथे पाहा...

19-09-2021: दुबई - विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज - संध्याकाळी 7.30

23-09-2021: अबू धाबी - विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स - संध्याकाळी 7.30

26-09-2021: दुबई - विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर - संध्याकाळी 7.30

28-09-2021: अबू धाबी - पंजाब किंग्ज विरुद्ध - संध्याकाळी 7.30

02-10-2021: शारजाह - विरुद्ध दिल्ली राजधानी - दुपारी 3.30

05-10-2021: शारजाह - विरुद्ध राजस्थान रॉयल्स - संध्याकाळी 7.30

08-10-2021: अबू धाबी - विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद - संध्याकाळी 7.30

मे महिन्याच्या सुरुवातीला स्पर्धेची 14 वी आवृत्ती कोरोनामुळे पुढे ढकलली गेली होती. 9 एप्रिल रोजी कोरोनाच्या वाढत्या संक्रमण दरम्यान भारतात स्पर्धेची सुरुवात झाली होती परंतु काही खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी संक्रमित झाल्यामुळे चार मे रोजी 29 सामने झाल्यावर स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली होती. दरम्यान, आयपीएल स्थगित होईपर्यंत रिषभ पंतच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्सने आठ सामन्यांमधून सहा विजयांसह आघाडी घेतली होती तर एमएस धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज संघ गुणतालिकेत दुसर्‍या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर विराट कोहलीची आरसीबी पाच विजयांसह तिसर्‍या स्थानावर असून मुंबई चौथ्या स्थानावर आहे. तसेच वेळापत्रक जाहीर झाले असताना आता परदेशी खेळाडूंच्या खेळण्यावर अद्याप संभ्रम कायम आहे. ऑस्ट्रेलियन पॅट कमिन्सने आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातून माघार घेतली आहे तर इंग्लंड बोर्डाने यापूर्वी टी-20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंनी आयपीएलसाठी पाठवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता त्यांच्या बदली कोणत्या खेळाडूंना संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.