
Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad, 33rd Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा (IPL 2025) 33 वा सामना आज म्हणजेच 17 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (MI vs SRH) यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. या हंगामात, मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हार्दिक पांड्या (Hardik Pandya) करत आहे. तर, सनरायझर्स हैदराबादची कमान पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) खांद्यावर आहे. आतापर्यंत मुंबईने सहा सामने खेळून दोन सामने जिंकले आहेत. तर, हैदराबादची आकडेवारी देखील मुंबईसारखीच आहे. त्यांनीही फक्त दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे पाॅइंट टेबलमध्ये पुढे जाण्यासाठी दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.
हेड टू हेड रेकाॅर्ड (MI vs SRH Head to Head Record)
आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात एकूण 23 सामने खेळले गेले आहेत. या काळात, मुंबई इंडियन्सने वरचढ कामगिरी केली आहे. मुंबई इंडियन्स संघाने 13 सामने जिंकले आहेत. तर, सनरायझर्स हैदराबादने फक्त 10 सामने जिंकले आहेत. या हंगामात दोन्ही संघांमधील ही पहिलीच भेट आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामात दोन्ही संघांमध्ये दोन सामने खेळले गेले होते. या काळात दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला.
सर्वांच्या नजरा असतील 'या' खेळांडूवर
सूर्यकुमार यादव: मुंबई इंडियन्सचा घातक फलंदाज सूर्यकुमार यादवने गेल्या 10 डावांमध्ये 381 धावा केल्या आहेत. यादरम्यान, सूर्यकुमार यादवने 161.59 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादवचे शानदार टायमिंग आणि क्लासिक फटके सामना मुंबई इंडियन्सच्या बाजूने वळवू शकतात.
रोहित शर्मा: रोहित शर्माने आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 34 सामन्यांमध्ये एकूण 896 धावा केल्या आहेत. रोहित शर्माला 1000 चा आकडा गाठण्यासाठी फक्त 104 धावांची आवश्यकता आहे. जर रोहित शर्मा मैदानावर राहिला तर तो एकाच सामन्यात हा आकडा गाठू शकतो.
जसप्रीत बुमराह: मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने गेल्या नऊ सामन्यांमध्ये १६ विकेट्स घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराहची अचूक गोलंदाजी फलंदाजांना त्रास देऊ शकते.
अभिषेक शर्मा: सनरायझर्स हैदराबादचा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्माने गेल्या 10 सामन्यांमध्ये 431 धावा केल्या आहेत. या काळात अभिषेक शर्माने 179.32 च्या स्फोटक स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. अभिषेक शर्माची आक्रमक फलंदाजी एसआरएचसाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
हेनरिक क्लासेन: सनरायझर्स हैदराबादचा घातक फलंदाज हेनरिक क्लासेनने 347 धावा केल्या आहेत. या काळात, हेनरिक क्लासेनने 61 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. जर हेनरिक क्लासेन स्थिरावला तर तो विरोधी गोलंदाजांसाठी मोठ्या समस्या निर्माण करू शकतो.
मोहम्मद शमी: एसआरएचचा घातक फलंदाज मोहम्मद शमीने आतापर्यंत 9 सामन्यांमध्ये 16 विकेट्स घेतल्या आहेत. या काळात, मोहम्मद शमीने 7.44 च्या इकॉनॉमीने गोलंदाजी केली आहे. डेथ ओव्हर्समध्ये मोहम्मद शमीची गोलंदाजी विरोधी संघांचे कंबरडे मोडू शकते.
दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर एक नजर
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विरेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिशेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट आणि अश्विनी कुमार.
सनरायझर्स हैदराबादः ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, कामिंडू मेंडिस, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), झीशान अन्सारी, जयदेव उनाडकट आणि मोहम्मद शमी.