एमएस धोनीची लेक झिवा हिने हातात घेतली तलवार; झांसीची राणी बनत 'या' स्पेशल गाण्यावर केलं सादरीकरण, पहा व्हिडिओ
झिवा धोनी (Photo Credits: Twitter/ DHONIsm)

देशभरात 73 वा स्वांतंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याने वेस्ट इंडीज (West Indies) दौऱ्यातून माघार घेतल्यानंतर सध्या तो लष्करात ट्रेनिंग घेत आहे. आजपासून तो लडाखच्या दौऱ्यावर जाणार आहे. आजच्या खास दिवशी अनेक शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. एकीकडे धोनी सीमेवर देशाचे रक्षण करत आहे, तर त्याची लेक झिवा (Ziva) हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आज, भारताच्या स्वतंत्र दिनाच्या दिवशी शाळेच्या एका कार्यक्रमादरम्यान आयोजित कऱण्यात आलेल्या कार्यक्रमात झिवाने केलेल्या परफॉर्मन्सची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. (Happy Independence Day 2019: टीम इंडियाने वेस्ट इंडिजमधून देशवासियांना दिल्या 73 व्या स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा, पहा Video)

स्वातंत्र्यदिनानिमित्त झिवाच्या शाळेत वेशभूषा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये झिवाने झाशीच्या राणीची वेशभुषा केली होती. हातात तलावर आणि ढाल घेऊन चिमुकली झिवा कार्यक्रमात सहभागी झाली होती. तिने डोक्यावर पगडी देखील घातली होती. अन्य मुलांपैकी कोणी महात्मा गांधी, चंद्रशेखर आझाद तर कोणी जवाहरलाल नेहरू झाले होते. झिवाच्या या पोषकाने सर्वांची मनं जिंकली. जर धोनी भारताच्या सीमेचे रक्षण करत आहे, तर त्याची लेक देखील देश प्रेम व्यक्त करण्यात मागे नाही. क्रिकेट चाहत्यांना हा व्हिडिओ खूप पसंत पडला आहे. या कार्यक्रमादरम्यान सर्व मुलांनी 'नन्हा-मुन्ना राही हूं, देश का सिपाही हूं ...' या गाण्यावर परफॉर्म केले. झांसीची राणी म्हणून झिवाने देखील या गाणे सादर केले.

झिवा

दरम्यान, धोनीचे लष्करी प्रशिक्षण 15 ऑगस्टला पुर्ण होणार आहे. विंडीज दौऱ्यातून माघार घेतल्यानंतर धोनी निवृत्ती घेणार अशी चर्चा सुरू झाली होती. अखेर बीसीसीआय़नेच धोनीची संघाला गरज असून त्याचे मार्गदर्शन संघाला लागणार आहे असं म्हटलं होतं.