Happy Independence Day 2019: टीम इंडियाने वेस्ट इंडिजमधून देशवासियांना दिल्या 73 व्या स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा, पहा Video
भारतीय संघ (Photo Credit/Getty Image)

कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यावर दमदार कामगिरी करत आहे. टी-20 मालिकेवर निर्विवाद वर्चस्व गाजवल्यावर टीम इंडिया (Team India) आता वनडे मालिका देखील खिशात घालण्याच्या तयारीत आहे. पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानात सुरु असलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात भारताने आपला प्रभाव बनवून ठेवला आहे. आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. एकीकडे टीम इंडिया सामना जिंकत क्लीन स्वीप करण्याच्या प्रयत्नात असेल. तर दुसरीकडे, विंडीज संघ बरोबरीसाधत मालिका बचावण्याचा प्रयत्न करेल. आज, सर्व भारतीयांसाठी एक महत्वाचा दिवस आहे. आजच्या दिवशी 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला होता. (Independence Day 2019: स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलेल्या भाषणातील काही महत्वाचे मुद्दे)

आजचा दिवस साजरा करण्यासाठी सर्व देशवासी सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा देत आहे. यात भारतीय संघ देखील मागे नाही. विंडीज दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाने व्हिडिओद्वारे सर्व देशवासियांना शुभेच्छा दिला आहेत. भारतीय क्रिकेट बोर्ड, बीसीसीआयने (BCCI) याचा व्हिडिओ शेअर केला आहे. पहा व्हिडिओ:

दुसरीकडे, आजच्या सामन्यात विजय मिळवत टीम इंडिया देशातील सर्व क्रिकेट चाहत्यांना विजयी भेट देऊ शकते. 72 वर्षांच्या इतिहासात टीम इंडियाला 15 ऑगस्ट रोजी खेळण्यात आलेल्या एकही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही आणि यंदा विराटसेनेला हा इतिहास पुसून टाकण्याची संधी आहे.