Ziva Dhoni ने लावले भाजी मार्केट (Photo Credit: Instagram)

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीची (Mahendra Singh Dhoni) मुलगी झिवा धोनी (Ziva Dhoni) नेहमीच चर्चेत राहते. 5 वर्षाची झिवाचे गोंडस व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि नुकतंच त्याचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये झीवाने भाजीचं दुकान घातलेलं दिसत आहे. व्हिडीओमध्ये झिवा बऱ्याच भाज्या घेऊन बसलेली दिसत आहे. त्याच वेळी, जेव्हा आई साक्षी (Sakshi Dhoni) तिला विचारते की तिने त्या भाज्या कुटून आणल्या तर ती आपल्या घरातल्या बागेतून आणल्याचे सांगते. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला टीम इंडियाचा वर्ल्ड कप विजेता धोनी सध्या रांची येथील आपल्या फार्महाऊसमध्ये शेतीची कामं पाहत आहे. रांची (Ranchi) येथील सात एकर फार्महाऊसमध्ये धोनीने शेती क्षेत्रात प्रवेश केला आहे. त्याने लावलेल्या फळ-भाज्यांमध्ये स्ट्रॉबेरी, कोबी, टोमॅटो, ब्रोकोली, वाटाणे आणि पपई इत्यादी आहे. (MS Dhoni याला नाही आवरला आपल्या शेतातील स्ट्रॉबेरी खाण्याचा मोह, खाऊन पहा काय म्हणाला Watch Video)

दरम्यान, व्हिडिओमध्ये झिवा भाजीपाला ओळखताना ही दिसत आहे. झिवाचा व्हिडिओ तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. झिवाच्या या व्हिडिओवर यूजर्स बऱ्याच प्रतिक्रिया देत आहे. शिवाय, वडील धोनीनंतर आता यूजर्सची लाडकी झिवा देखील शेती क्षेत्रात रस घेताना दिसत आहे. झिवाचा हा क्युट व्हिडिओ आई साक्षी सिंह धोनीने कॅप्चर केला असून बॅकग्राउंडमध्ये तिचा आवाज ऐकू येऊ शकतो. "व्हेजिससाठी प्रेम! #होमग्रोन," असे व्हिडीओला कॅप्शन दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZIVA SINGH DHONI (@ziva_singh_dhoni)

दरम्यान, धोनी आपल्या फार्महाऊसमध्ये पिवकवलेला भाजीपाला स्थानिक बाजारात वाजवी दरात विकत असल्याचं समजत आहे. शिवाय झारखंडच्या कृषी विभागाने त्यांना सहकार्य करण्याची ग्वाही दिली असल्याने तो आपल्या शेतातील भाजीपाला संयुक्त अरब अमिरातीमध्येही ही निर्यात करणार आहेत. धोनीने यापूर्वी स्वत:चा एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यात तो आपल्या शेतात उगवलेली स्ट्रॉबेरीची चव घेताना दिसत होता. अलीकडे, झिवा आणि एमएस धोनी एका बिस्किट ब्रँड, Oreo च्या जाहिरातीसाठी एकत्र आले.