वर्ष 2020 सुरु झाले आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) आणि पत्नी साक्षी (Sakshi) यांनी नवीन वर्षाचे स्वागत जंगी केले. धोनी आणि पत्नी साक्षीने 2020 चे जोरदार पद्धतीने स्वागत केले आणि या जोडीच्या डान्सच्या एका व्हिडिओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. साक्षी धोनीने पती एमएसबरोबर एक सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि लिहिले, “या व्यक्तीसह 2020” असे कॅप्शन दिले. ऑगस्टमध्ये न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी क्रिकेट विश्वचषक (World Cup) 2019 सेमीफायनलमधून बाहेर पडल्यापासून, धोनीने स्वत:ला खेळण्यासाठी अनुपलब्ध केले आहे. क्रिकेटमधून काही काळ विश्रांती घेत 38 वर्षीय धोनीने भारतीय सैन्यातही काम केले. विश्वचषकनंतर गेल्या काही महिन्यांत वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकाविरुद्ध भारतीय संघात (Indian Team) अनुपस्थित राहिल्यानंतर धोनीने बांग्लादेश आणि विंडीज मालिकेमधूनही माघार घेतली. मंगळवारी (31 डिसेंबर) भारतात परतल्यानंतर साक्षी आणि एमएसने पुण्यात नवीन वर्षाची पूर्वसंध्या साजरी केली. (New Year 2020: वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली यांच्यासमवेत दिग्गज खेळाडूंनी खास अंदाजात दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा)
पुण्यातील या पार्टीमध्ये धोनी आणि साक्षीने डान्सही केला. धोनीच्या फॅन क्लबने दोघांच्या डान्सचा व्हिडिओ शेअर केला. यामध्ये धोनी आणि साक्षी एकत्र रोमांटिक डान्स करताना पाहायला मिळत आहे. भारताचा माजी कर्णधार जरी संघापासून दूर असला तरी अशा परिस्थितीत तो त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन वेगळीच पद्धतीने करत आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने धोनीने पत्नी साक्षीसह 2020 चे जोरदार शैलीने स्वागत केले आणि सर्वांना आनंदित केले. दोघांचा व्हिडिओ पाहून तुम्हीही आनंदित व्हाल:
View this post on Instagram
New Year Celebrations of our King & Queen ! 😍❤ . Happy New Year Everyone! 🎉💙
विश्वचषकमधील संथ कामगिरीनंतर दर आठवड्यात धोनीच्या भविष्याविषयी नवनवे अनुमान लावले जात होते, पण मागील महिन्यात धोनीने स्वतः यावर स्पष्टीकरण दिले. मुंबईतील एका प्रमोशनल कार्यक्रमादरम्यान धोनीने काही प्रश्नांची उत्तरे दिली आणि बुधवारी (27 नोव्हेंबर) त्याच्या भविष्याविषयी स्पष्टीकरण दिले. धोनीने सर्वात लोकप्रिय प्रश्नाचे उत्तर दिले आणि हिंदीमध्ये म्हटले, "जानेवारी तक मत पूछो (जानेवारीपर्यंत मला विचारू नका)". यानंतर नुकतंच किंग्स इलेव्हन पंजाबचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2020 दरम्यान धोनीची कामगिरी आगामी टी-20 विश्वचषक संघात त्याचे स्थान निश्चित करेल असा दावाही त्यांनी केला.