MS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो
MS Dhoni (Photo Credit: Twitter)

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) 15 ऑगस्ट 2019 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. सध्या धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या (CSK) संघाचे नेतृत्व करताना दिसत आहे. सध्या भारतीय संघ रेट्रो जर्सी (Retro Jersey) घालून मैदानात उतरत आहेत. धोनीच्या चाहत्यांनी धोनीला भारतीय संघाच्या जर्सी पाहण्याची इच्छा अनेकदा बोलून दाखवली होती. एवढेच नव्हेतर, धोनीच्या चाहत्यांनी फोटोशॉपचा आधार घेत त्याला रेट्रो जर्सी घालून सोशल मीडियावर फोटो शेअर केले होते. मात्र, धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे स्वप्न बघण्याची इच्छा ठेवलेल्या सर्व चाहत्यांचे स्वप्न आता साकार झाले आहे.

धोनीने टीम इंडियाची रेट्रो जर्सी एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी घातली होती. हा फोटो पाहून धोनीच्या चाहत्यांमध्ये स्वप्न पूर्ण झाल्याची भावना होती. धोनी सध्या मुंबईत आहे आणि नुकताच तो बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगसोबत फुटबॉल सामना खेळताना दिसला होता. हे देखील वाचा- Mahendra Singh Dhoni आणि Ranveer Singh यांची फुटबॉलच्या मैदानात मौजमजा, फोटो व्हायरल

ट्वीट-

ट्वीट-

आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने निराशाजनक कामगिरी केली होती. मात्र, यावर्षी चेन्नईच्या संघाने दमदार कामगिरी करून दाखवली आहे. आयपीएल 2021 स्थगित होईपर्यंत धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सची कामगिरी धमाकेदार झाली होती. 7 पैकी 5 मॅच जिंकत चेन्नई पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यांच्या खात्यात 10 पॉईंट्स आहेत. आयपीएलच्या (IPL 2021) दुसऱ्या सत्राला 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरुवात होत आहे. पहिलाच सामना चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे.